घरदेश-विदेशवंदे भारत ट्रेनचा पुन्हा अपघात, गायीला टक्कर लागल्याने इंजिन बिघडले

वंदे भारत ट्रेनचा पुन्हा अपघात, गायीला टक्कर लागल्याने इंजिन बिघडले

Subscribe

सूरत – वंदे भारत ट्रेनचा (Vande Bharat Train) पुन्हा एकदा अपघात झाला आहे. गुजरातहून वलसाडदरम्यान वंदे भारत ट्रेनला एका गायीने टक्कर दिली. त्यामुळे ट्रेनच्या पुढचा भाग तुटला आहे. वलसाडमध्ये अतुल स्थानकाच्या बाजूला वंदे भारत ट्रेनला अपघात झाला. गायीच्या टक्करमुळे रेल्वेचे इंजिन नादुरुस्त झालं आहे. हा अपघात होताच रेल्वे विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. (Vande Bharat Train Accident in Valsad)

भारतीय रेल्वे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी ८ वाजून १७ मिनिटांनी वंदे भारत ट्रेनचा अपघात झाला. वंदे भारत ट्रेन मुंबईहून गांधीनगरला जात होती. त्यावेळी वलसाड येथील अतुल स्थानकाजवळ एका गायीने ट्रेनला टक्कर दिली. यामुळे रेल्वेचं इंजिन खराब झालं आहे. तसंच, अपघात झाल्यानंतर ट्रेन १५ मिनिटे थांबवण्यात आली होती.

- Advertisement -

अपघातानंतर वंदे भारत ट्रेनचे कोणतेही नुकसान झाले नसल्याचे भारतीय रेल्वेच्या वतीने सांगण्यात आले. फक्त पुढच्या कोचच्या शंकूच्या कव्हरला म्हणजेच ड्रायव्हरच्या कोचचे नुकसान झाले आहे.


याआधी ७ ऑक्टोबर रोजी देखील भारतातील पहिली हायस्पीड वंदे भारत ट्रेन गायीला धडकली होती. वडोदरा विभागातील आणंदजवळ वंदे भारत ट्रेनची एका गायीला धडक बसली. 7 ऑक्टोबर 2022 रोजी ही ट्रेन गांधीनगर ते मुंबई असा प्रवास करत होती. ही घटना दुपारी 3.44 वाजता घडली आणि सुमारे 10 मिनिटे ट्रेन रोखून धरण्यात आली. ट्रेनचे कोणतेही नुकसान झाले नसल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले होते. मात्र, समोरच्या कोचच्या शंकूच्या कव्हरला म्हणजेच ड्रायव्हर कोचचे किरकोळ नुकसान झाले.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -