Homeक्राइमAnother Atul Subhash : पत्नी आणि सासरच्या छळाला कंटाळून पोलिसाची आत्महत्या, काय...

Another Atul Subhash : पत्नी आणि सासरच्या छळाला कंटाळून पोलिसाची आत्महत्या, काय आहे प्रकरण?

Subscribe

बंगळुरूमधील हुलीमावू वाहतूक पोलीस ठाण्यात तैनात असलेला 34 वर्षीय तिप्पण्णा हे हेड कॉन्स्टेबल विजयपुरा जिल्ह्याच्या सिंदगीजवळील हंडीगनूर गावचे रहिवासी होते. त्यांनी शुक्रवारी रात्री शहरातील हेलालिगे रेल्वे स्टेशन ते कारमेलराम हुसगुरु रेल्वे फाटकादरम्यान रेल्वेखाली आत्महत्या केली.

(Another Atul Subhash) बंगळुरू : अभियंता अतुल सुभाष याच्या आत्महत्येवरून वातावरण तापलेले असतानाच बंगळुरूमध्येच पोलीस हेड-कॉन्स्टेबलने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. पत्नी आणि सासरच्या मंडळींकडून कथितरीत्या छळ होत असल्याने त्याने हे पाऊल उचलल्याचे पोलिसांनी शनिवारी सांगितले. (A policeman commits suicide in Bangalore after being harassed by his wife and father-in-law)

मूळचा बिहारचा रहिवासी असलेल्या 34 वर्षीय एआय अभियंता अतुल सुभाष याने पत्नी आणि सासरच्या जाचाला कंटाळून बंगळुरूमध्ये गळफास घेत आत्महत्या केल्याचे अलीकडेच उघड झाले होते. त्याने आत्महत्येपूर्वी सुमारे दीड तासांचा व्हिडीओ आणि तब्बल 24 पानांची सुसाइड नोट लिहिली होती. याप्रकरणी अतुल सुभाषची पत्नी निकिता सिंघानिया, तिची आई निशा आणि भाऊ अनुराग यांचा बंगळुरू पोलीस शोध घेत आहेत. त्यापाठोपाठ बंगळुरूमध्ये अशीच एक घटना समोर आली आहे.

हेही वाचा – SS UBT & Hindutva : विधानसभेनंतर ठाकरेंकडून पुन्हा हिंदुत्वाचा जागर, मविआ फुटणार?

बंगळुरूमधील हुलीमावू वाहतूक पोलीस ठाण्यात तैनात असलेला 33 वर्षीय तिप्पण्णा हे हेड कॉन्स्टेबल विजयपुरा जिल्ह्याच्या सिंदगीजवळील हंडीगनूर गावचे रहिवासी होते. त्यांनी शुक्रवारी रात्री शहरातील हेलालिगे रेल्वे स्टेशन ते कारमेलराम हुसगुरु रेल्वे फाटकादरम्यान रेल्वेखाली आत्महत्या केली. पोलिसांना घटनास्थळी एक सुसाइड नोट सापडली, ज्यामध्ये तिप्पण्णा यांनी पत्नी आणि सासरे यमुनप्पा यांना आत्महत्येसाठी जबाबदार धरले आहे.

या दोघांनी 12 डिसेंबर रोजी संध्याकाळी 7.26 वाजता फोन केला. ते माझ्याशी 14 मिनिटे बोलले, पण यादरम्यान त्यांनी मला धमकावले. दुसऱ्या दिवशी मी माझ्या सासऱ्यांशी बोललो तेव्हा त्यांनी मला ‘मर’ म्हणून सांगितले. तुझ्याशिवाय माझी मुलगी सुखात राहील, असेही ते म्हणाल्याचे तिप्पण्णा यांनी मरणापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद केले आहे. त्यांनी माझ्यासोबतही गैरवर्तनही केल्याचे त्यांनी म्हटले आहे. बायप्पनाहल्ली रेल्वेपोलिसांनी याप्रकरणी भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम 108, 351(3) आणि 352 अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

सोशल मीडियावर तीव्र पडसाद

अतुल सुभाष याच्या आत्महत्येनंतर #MenToo आणि #JusticeForAtulSubhash हे सोशल मीडियावर ट्रेंड झाले आहे. या मोहिमेच्या माध्यमातून अनेक पुरुषांनी आपल्या वेदना आणि अनुभव शेअर केले आहेत. या दोन्ही घटनांमुळे पुरुषांचे हक्क आणि विवाहसंबंधातील वादात न्यायाची मागणी केली असून याबाबत समाजात नव्या वादाला तोंड फुटले आहे. (Another Atul Subhash: A policeman commits suicide in Bangalore after being harassed by his wife and father-in-law)

हेही वाचा – Dadar Mandir : दर्शनासाठी गेलेल्या सोमय्यांची ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी काढली लायकी, हनुमान मंदिराबाहेर काय घडले?


Edited by Manoj S. Joshi