कराची:भारताचा आणखी एक मोस्ट वाँटेड दहशतवादी पाकिस्तानमध्ये मारला गेला. लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख दहशतवादी अदनान अहमद उर्फ हंजला अदनान याची कराचीमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली आहे. 2-3 डिसेंबरच्या रात्री हल्लेखोरांनी हंजला याची चार गोळ्या झाडून हत्या केली. हल्लेखोरांनी हल्ला केला तेव्हा हंजला त्याच्या घराच्या बाहेर उभा होता. गोळी लागल्याने हंजाला गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर पाकिस्तानी लष्कराने त्याला गुप्तपणे कराची येथील रुग्णालयात दाखल केले, तेथे उपचारादरम्यान 5 डिसेंबर रोजी त्याचा मृत्यू झाला. (Another enemy of India has a throat bath Top terrorist of Lashkar e Toiba killed in Pakistan )
2016 मध्ये पंपोरमध्ये CRPF च्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याचा मास्टरमाईंड लष्कराचा दहशतवादी हंजला अदनान होता. ताफ्यावर झालेल्या या हल्ल्यात 8 जवान हुतात्मा झाले तर 22 जवान जखमी झाले. याशिवाय हंजलाने 2015 मध्ये जम्मूच्या उधमपूरमध्ये बीएसएफच्या ताफ्यावरही हल्ला केला होता. या हल्ल्यात 2 जवान शहीद झाले तर 13 जवान जखमी झाले. या दोन्ही हल्ल्यांमध्ये हंजला पाकिस्तानात बसून दहशतवाद्यांना सूचना देत होता. हंजला अदनान हा लष्कर प्रमुख हाफिज सईदचा निकटवर्तीय होता.
हंजलाचा मृत्यू हा लष्कर प्रमुख हाफिज सईदसाठी मोठा धक्का मानला जात आहे. अदनान अहमद उर्फ हंजला अदनान हा लष्कर प्रमुख हाफिजच्या जवळचा होता. 2-3 डिसेंबरच्या रात्री अज्ञात हल्लेखोरांनी 4 गोळ्या झाडून हे हत्याकांड घडवून आणले. कडेकोट बंदोबस्तात अदनानची हत्या करण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अदनान अहमदला त्याच्या सुरक्षित घराबाहेर गोळ्या घालण्यात आल्या, गोळी झाडल्यानंतर त्याला पाकिस्तानी लष्कराने गुप्तपणे कराची येथील रुग्णालयात दाखल केले. 5 डिसेंबर रोजी त्यांचे निधन झाले. हाफिजसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. हंजलाने अलीकडेच रावळपिंडीहून कराचीला आपला ऑपरेशन तळ हलवला होता.
पाकिस्तानमध्ये अशा प्रकारे दहशतवाद्यांना लक्ष्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी मुफ्ती कैसर फारुख, खलिस्तानी दहशतवादी परमजीत सिंग पंजवाड, एजाज अहमद अहंगर, बशीर अहमद पीर यांसारख्या अनेक दहशतवाद्यांनाही अज्ञात हल्लेखोरांनी ठार केले होते.
इतकेच नाही तर अलीकडेच मोस्ट वॉन्टेड दहशतवादी शाहिद लतीफची हत्या करण्यात आली होती. लतीफची सियालकोटमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. 2016 मध्ये पठाण कोट एअरफोर्स स्टेशनवर झालेल्या हल्ल्याचा लतीफ मास्टरमाइंड होता. स्टेशनवर हल्ला करणाऱ्या चार दहशतवाद्यांना तो पाकिस्तानमधून सूचना देत होता.
(हेही वाचा: Mumbai Crime पालकांनो मुलं सांभाळा; नवी मुंबईतून 48 तासांत 6 मुलं बेपत्ता! )