घरदेश-विदेशभारताच्या ताब्यात लेथपोरा हल्ल्याचा मास्टरमाइंड

भारताच्या ताब्यात लेथपोरा हल्ल्याचा मास्टरमाइंड

Subscribe

जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटनेचा सदस्य आणि लेथपोरा येथील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड निसार अहमद तांत्रे याला रविवारी दि. ३१ रोजी विशेष विमानाने दिल्लीमध्ये आणण्यात आले. यूएईने निसारला भारताला सोपवले आहे.

जम्मू-काश्मीर येथील पुलवामा जिल्ह्यात १४ फेब्रुवारी रोजी सीआरपीएफच्या जवानांच्या ताफ्यावर भ्याड दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे ४० हून अधिक जवाान शहीद झाले होते. तसेच या भ्याड हल्ल्याची जवाबदारी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने घेतली होती. याच दहशतवादी संघटनेचा सदस्य भारताच्या ताब्यात आला आहे. निसार अहमद तांत्रे असे या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या सदस्याचे नाव आहे. निसारला संयुक्त अरब अमीरात (यूएई)ने भारताच्या ताब्यात दिले आहे. ३०-३१ डिसेंबर २०१७ मध्ये जम्मू-काश्मीरमधील लोथपोरा येथे सीआरपीएफच्या कॅम्पवर हल्ला करण्यात आला होता. या हल्लाचा मास्टरमाइंड हा निसार तांत्रे होता. या हल्ल्यात पाच जवान शहीद झाले होते. तर चकमकीत भारतीय जवानाने ३ दहशतवाद्यांना ठार केले होते. दक्षिण काश्मीरचा जैशेचा कमांडर नूर तांत्रे याचा तो भाऊ आहे.

लेथपोराचा मास्टरमाइंड अटकेत

जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटनेचा सदस्य निसार अहमद तांत्रे याला रविवारी दि. ३१ रोजी विशेष विमानाने दिल्लीमध्ये आणण्यात आले. तसेच त्याला राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवण्यात आले आहे. लेथपोरामध्ये झालेल्या हल्ल्यासंबंधीत चौकशी एनआयए कडून केली जात होती. तसेच एनआयएच्या विशेष न्यायाधीशांनी निसारविरोधात अटक वॉरंट जाहिर केला आहे. तसेच कश्मीर खोऱ्याच जैश-ए-मोहम्मद या संघटनेचा जम बसवण्यासाठी नूर तांत्रे यांनीच मदत केली होती. तर नूरला डिसेंबर २०१७ मध्ये ठार करण्यात आले होते.

- Advertisement -

यूएईकडून भारताच्या स्वाधीन

दरम्यान, काही वर्षापासून यूएईने अनेक गुन्हेगार भारताला सोपवले आहेत. गुन्हेगारच नाही, तर दहशतवाद्यांचा सुद्धा यात समावेश आहे. १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी फारूख टकला याला भारताला सोपवले होते. तसेच वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणी लाच घेणाल्याचा आरोप असणाऱ्या समर्थकांन सुद्धा भारताला सोपवले होते. तर एनआयएकडून माहितीनुसार असे समोर आले की, निसार तांत्रे २०१९मध्येच भारतातून यूएईमध्ये पळून गेला होता.

लेथपोरा हल्ल्यात समावेश

लेथपोरा येथील सीआरपीएफच्या कॉम्पवर झालेल्या हल्ल्यात पुलवामा, अवंतिपूरा येथील फय्याज अहमद याचा सहभाग होता. या हल्ल्यात सहभागी असणाऱ्या फरदीन अहमद खांडे हा त्रालमधील, मंजूर बाबा हा पुलवामामधील आणि अब्दूल शकूर हा पाकिस्तानचा नागरिक अश्या तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -