भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मांविरोधात आणखी एक FIR दाखल; मोहम्मद पैगंबरांविरोधात केले वादग्रस्त वक्तव्य

एका पोलीस अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून हैदराबादमधील सायबर क्राइम पोलीस ठाण्यात शर्मा यांच्याविरुद्ध आयपीसीच्या कलम 153 (ए), 504, 505 (२) आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

another fir files against bjp spokesperson nupur sharma alleging controversial statement on prophet mohammad
भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मांविरोधात आणखी एक FIR दाखल; मोहम्मद पैगंबरांविरोधात केले वादग्रस्त वक्तव्य

ज्ञानवापीच्या मुद्द्यावरून (Gyanvapi Masjid Controversy) एका इंग्रजी वृत्तवाहिनीच्या चर्चेदरम्यान मोहम्मद पैगंबर यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा (BJP Spokesperson Nupur Sharma) यांच्याविरोधात आणखी एक FIR दाखल झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याने 31 मे रोजी पुण्यातील कोंढवा पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीच्या आधारे हा एफआयआर नोंदवण्यात आला आहे. (Bharatiya Janata Party)

शर्मा यांच्याविरुद्ध यापूर्वी अशाच कायदेशीर तरतुदींनुसार दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. भारतीय सुन्नी मुस्लिमांच्या सुन्नी बरेलवी संघटनेच्या रझा अकादमीच्या तक्रारीनंतर मुंबईत भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 295A, 153A आणि 505B अंतर्गत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

एका पोलीस अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून हैदराबादमधील सायबर क्राइम पोलीस ठाण्यात शर्मा यांच्याविरुद्ध आयपीसीच्या कलम 153 (ए), 504, 505 (२) आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तक्रारीत असे आरोप करण्यात आले की, शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर आणि इस्लाम धर्माविरूद्ध अपमानास्पद, खोटे आणि दुखावणारे शब्द वापरले ज्यामुळे मुस्लिमांच्या भावना दुखावल्या आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे.

यापूर्वी 27 मे रोजी शर्मा यांनी आरोप केला होता की, त्यांना सोशल मीडियावर जीवे मारण्याच्या आणि बलात्काराच्या धमक्या मिळत होत्या. यावर नुपूर शर्मा यांनी सांगितले की, “एक तथाकथित फॅक्ट चेकरने काल रात्री माझ्या एका वादविवादाचा निवडक व्हिडिओ टाकून वातावरण बिघडवण्यास सुरुवात केली. तेव्हापासून मला जीवे मारण्याच्या आणि बलात्काराच्या धमक्या मिळत आहेत, ज्यात माझ्यासह माझ्या कुटुंबियांनाही शिरच्छेदाच्या धमक्या येत आहेत.

शर्मा यांनी आरोप केला आहे की, एका Alt न्यूजच्या मालकाने त्यांच्याविरुद्ध ट्रोल्सला प्रोत्साहन देण्यासाठी संबंधित व्हिडिओ पोस्ट केला. यामुळे जर माझ्या कुटुंबियांचे काही नुकसान झाल्यास त्यांनाच “जबाबदार” मानले जावे.

त्यांनी पुढे म्हटले की, “मी पोलीस आयुक्त आणि दिल्ली पोलीस यांना टॅग केले आहे. मला आणि माझ्या कुटुंबातील सदस्यांना त्रास होईल अशी मला शंका आहे. जर मला किंवा माझ्या कुटुंबीयांना काही नुकसान झाले तर याला मोहम्मद जुबेर जबाबदार असतील.


Bhajan Sopori Death: प्रसिद्ध संतूर वादक पंडित भजन सोपोरी यांचे निधन