Wednesday, June 7, 2023
27 C
Mumbai
घर क्राइम बांगलादेशात प्रियकराकडून प्रेयसीची हत्या; शरीराचे तुकडे करत फेकले नाल्यात

बांगलादेशात प्रियकराकडून प्रेयसीची हत्या; शरीराचे तुकडे करत फेकले नाल्यात

Subscribe

दिल्लीमधील श्रद्धाच्या हत्येप्रमाणे देशभरात अशा अनेक घटना घडत असून, आणखी एक घटना बांगलादेशमध्ये घडल्याची माहिती समोर येत आहे. एका प्रियकराने त्याच्या प्रेयसीची हत्या केली. हत्येनंतर प्रियकराने प्रेयसीच्या शरीराचे तुकडे करत नाल्याच फेकल्याची घटना घडली.

दिल्लीमधील श्रद्धाच्या हत्येप्रमाणे देशभरात अशा अनेक घटना घडत असून, आणखी एक घटना बांगलादेशमध्ये घडल्याची माहिती समोर येत आहे. एका प्रियकराने त्याच्या प्रेयसीची हत्या केली. हत्येनंतर प्रियकराने प्रेयसीच्या शरीराचे तुकडे करत नाल्याच फेकल्याची घटना घडली. अबू बकर असे प्रियकराचे नाव असून, कविता राणी असे त्याच्या प्रेयसीचे नाव आहे. धक्कादायक बाब म्हणजे अबू बकर हा मुस्लीम असून त्याने हिंदू प्रेयसीची हत्या केली. (another hindu girl chopped into pieces by lover in bangladesh as shraddha murder)

मिळालेल्या माहितीनुसार, बांगलादेशमधील खुलना जिल्ह्यातील सोनदंगा भागात 6 नोव्हेंबर रोजी हा प्रकार घडल्याचे समजते. अबू बकर याने कविता राणी नामक हिंदू प्रेयसीची हत्या केल्याचा आरोप आहे. शीघ्र कृती दलाने अबूला अटक केली.

- Advertisement -

वॉईस ऑफ बांगलादेश हिंदूने दिलेल्या माहितीनुसार, अबू आणि कविता यांचे एकमेकांवर प्रेम होते. मात्र अबूचे आधीच लग्न झाल्याचे कविताला एके दिवशी समजले. त्यानंतर संतप्त कविताने अबूला याचा जाब विचारला. त्यावरुन दोघांचे कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर अबूने तिचे मुंडके उडवून तिचा जीव घेतल्याचा दावा केला जात आहे.

नेमकी घटना काय?

- Advertisement -

6 नोव्हेंबर रोजी अबू बकर कामावर न आल्याने ट्रान्सपोर्ट फर्मच्या मालकाने एका कर्मचाऱ्याला त्याच्या घरी तपासण्यासाठी पाठवले. त्यावेळी अबू बकर तेथे नसून त्याच्या घराला बाहेरून कुलूप होते. ही बाब मालकाला समजताच त्यांने अबू बेपत्ता झाल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या घराचे कुलूप तोडले आणि घरात त्यांना मृतदेह आढळून आला. ज्याचे डोके कापून पॉलिथिनमध्ये पॅक केले होते.

या घटनेनंतर पोलिसांनी अबू बकरविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिसांनी अबूसह त्याची ‘लिव्ह-इन’ पार्टनर सपना हिलाही अटक केली. अबू बकर हा त्याची पत्नी सपना गोबरचका चौरस्त्याजवळ मागील 4 वर्षांपासून राहत होता.


हेही वाचा – मोठी बातमी! डॉ. अमोल कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याच्या तयारीत, चर्चांना उधाण

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -