घर क्राइम मध्य प्रदेशातील आणखी एक घटना; दलित तरुणाचा मारहाणीत मृत्यू, आईला केले विवस्त्र

मध्य प्रदेशातील आणखी एक घटना; दलित तरुणाचा मारहाणीत मृत्यू, आईला केले विवस्त्र

Subscribe

सागर : माणुसकीला काळीमा फासणारी आणखी एक घटना मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात घडली आहे. येथे दलित मुलीच्या लैंगिक छळाच्या तक्रारीवरून आईला विवस्त्र करण्यात आले. तसेच बेदम मारहाण करून एका दलित व्यक्तीची हत्या करण्यात आल्याचेही समोर आले आहे. सागर जिल्ह्यात वारंवार अशा घटना घडत असल्याने शिवराजसिंह चौहान सरकार वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.

हेही वाचा – Ajit Pawar : मुख्यमंत्रीपदासाठी नाही तर, अजित पवार ‘या’ कारणाने सरकारमध्ये; काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा दावा

- Advertisement -

सागर जिल्ह्यात 2019मधील एका घटनेचे पडसाद पुन्हा एकदा उमटले आहेत. एका दलित मुलीने दाखल केलेल्या लैंगिक छळाच्या प्रकरणात शेकडो लोकांच्या जमावाने तिच्या भावाला बेदम मारहाण केली आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. त्याच्या बहिणीलाही मारहाण करण्यात आली आणि जेव्हा त्याच्या आईने आपल्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला तेव्हा जमावाने तिला विवस्त्र केले, असे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी नऊ मुख्य आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी तिघांवर खुनाचा आणि एससी/एसटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील आठ जणांना अटक करण्यात आल्याचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक संजीव उईके यांनी सांगितले. 2019च्या प्रकरणात तडजोड करण्यासाठी काही लोक आपल्यावर दबाव आणत होते आणि त्यामुळे तिच्यावर हल्ला करण्यात आला, असा आरोप 18 वर्षीय पीडितेच्या बहिणीने केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ‘तेवढे’ बळ अजित पवार यांच्यात आहे काय? ठाकरे गटाचा बोचरा सवाल

जमावाने आपल्या मुलाला खूप मारहाण केली. त्यात त्याचा जीव गेला. आम्हाला उघड्यावर आणले. मला तर, विवस्त्र केले. त्यानंतर पोलीस आले आणि त्यांनी मला एक टॉवेल दिला होता. मला साडी दिली जाईपर्यंत त्याच टॉवेलने मी माझे अंग झाकून घेतले, असे पीडित मुलीच्या आईने सांगितले. जमावाने आमच्या घराचीही तोडफोड केली. घरातील एकही साहित्य शाबूत राहिलेले नाही. अगदी पक्के छतही तुटले, असेही त्या महिलेने सांगितले.

मध्य प्रदेशातील घटनांचे सत्र सुरूच
सागर जिल्ह्यात चोरीच्या संशयावरून एका तरुणाला विवस्त्र करून काही लोकांनी लाठ्याकाठ्या आणि पाइपने मारहाण केल्याचा व्हिडीओ अलीकडेच समोर आला होता. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. तर, त्याआधी सिधी जिल्ह्यातील कुबरी गावात मद्यधुंद अवस्थेतील एक व्यक्ती अन्य आदिवासी तरुणाच्या अंगावर लघुशंका करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यावरून सर्वत्र संतापाची लाट उसळली होती.

- Advertisment -