Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश INDIA आघाडीत आणखी एक पक्ष होणार सहभागी; प्रियंका गांधींनी घेतला पुढाकार

INDIA आघाडीत आणखी एक पक्ष होणार सहभागी; प्रियंका गांधींनी घेतला पुढाकार

Subscribe

आगामी 2024 मधील लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपला रोखण्यासाठी देशभरातील विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडी उघडली आहे.

नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वीच ऐकला चलोचा नारा देणाऱ्या बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा मायावती यासुद्धा विरोधकांच्या इंडिया आघाडीत सहभागी होण्याची शक्यता वर्तविल्या जात आहे. कारण, काही दिवसापूर्वीच कॉंग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी त्यांची भेट घेतल्याचे आज समोर आले असून, या भेटीवरून उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे.(Another party to participate in INDIA alliance Priyanka Gandhi took the initiative)

आगामी 2024 मधील लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपला रोखण्यासाठी देशभरातील विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडी उघडली आहे. या आघाडीच्या आतापर्यंत तीन बैठका पार पडल्या आहेत. असे जरी असले तरी अद्यापही देशातील काही पक्ष तटस्थ असून, ते ना एनडीएचा भाग आहेत ना इंडियाचा. त्यामधीलच एक पक्ष म्हणजे मायावतींचा बसपा. या पक्षाने आपण कोणत्याही गटात जाणार नसून, तटस्थ राहणार असल्याची घोषणा केली होती. यादरम्यान मात्र आता एक मोठी घटना समोर आली असून, त्यामुळे बसपा इंडिया आघाडीत सहभागी होण्याची चर्चा होत आहे.

प्रियंका गांधीनी घेतली मायावतींची भेट

- Advertisement -

आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला हरविण्यासाठी इंडिया आघाडी एकही संधी सोडत नसल्याचे चित्र आहे. त्यामध्ये आता काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी आणि बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांच्यात गेल्या महिन्यात बैठक झाली होती. आता बसपाच्या नेतृत्वाशी जवळीक साधलेल्या एका माजी खासदाराचीही यात महत्त्वाची भूमिका असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा : 3847 कोटींचे कर्ज बुडवल्याच्या आरोपाखाली अवर्सेकांवर गुन्हा; उद्धव ठाकरेंसोबतचे कनेक्शन चर्चेत

यामुळे कॉंग्रेसचा पुढाकार

- Advertisement -

काँग्रेस बसपासोबत युती करण्यात अधिक रस घेत आहे. कारण, म्हणजे बसपाकडे अजूनही 10-12 टक्के व्होट बँक आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी बागेश्वर (उत्तराखंड) विधानसभेच्या जागेबाबत सपाविरोधात केलेल्या वक्तव्याचाही याच्याशी संबंध जोडला जात आहे. हायकमांडकडून सूचना मिळाल्यानंतरच अजय राय यांनी हे वक्तव्य केल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा : कुख्यात दहशतवादी उजैर खानचा खात्मा; अनंतनागमध्ये शांततेचे वातावरण

विधानसभेच्या निवडणुकीत निर्माण झाले होते अडथळे

उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी बसपा आणि कॉंग्रेस यांच्यामध्ये युती होती. यावेळी 125 जागांवर काँग्रेस आणि उर्वरित 278 जागांवर बसपा लढवणार हे निश्चित झाले होते. मात्र, त्यानंतर यामध्ये काही अडथळे निर्माण झाल्याने ही युती तुटली होती. त्यानंतर आता पुन्हा प्रयत्न केले जात आहे.

- Advertisment -