घरदेश-विदेशअन्सारी बंधुंना MP-MLA कोर्टाने ठोठावली शिक्षा; एका भावाची खासदारकी जाणार

अन्सारी बंधुंना MP-MLA कोर्टाने ठोठावली शिक्षा; एका भावाची खासदारकी जाणार

Subscribe

नवी दिल्लीः अपहरण आणि हत्येप्रकरणी गाझीपुर MP-MLA कोर्टाने गॅंगस्टर मुख्तार अन्सारीला दहा वर्षांची शिक्षा व पाच लाख रुपयांचा दंड  ठोठावला आहे. तर मुख्तारचा भाऊ बहुजन समाज पार्टीचा खासदार अफजालला न्यायालयाने ४ वर्षांची शिक्षा व एक लाखाचा दंड ठोठावला आहे.

मुख्तार सध्या बांदा कारागृहात आहे. त्याला व्हिडिओ कॉन्फेरेंसिगद्वारे खटल्यासाठी हजर करण्यात आले होते. तर अफजाल स्वतः न्यायालयात हजर होता. अफजालला न्यायालयाने ४ वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. न्यायालयाने लोकप्रतिनिधाला दोन वर्षांपेक्षा अधिक शिक्षा ठोठावल्यास त्याचे पद रद्द होते. या नियमामुळे अफजालची खासदारकी जाण्याची शक्यता आहे. न्यायालायने शिक्षा ठोठावल्यानंतर अफजालला गाजीपुर कारागृहात पाठवण्यात आले. विशेष न्यायालयाच्या या निकालाला ३० दिवसांच्या आत अफजाल उच्च न्यायालयात आव्हान देऊ शकतो.

- Advertisement -

भाजपचे माजी आमदार कृष्णानंद राय यांची २००५ मध्ये हत्या करण्यात आली होती. २००७ मध्ये याचा गुन्हा नोंदवण्यात आला. त्याआधी विश्व हिंदू परिषदचे पदाधिकारी नंदकिशोर रोंगता यांचे अपहरण व हत्येचा मुख्तार आणि अफजालवर आरोप होता. हे प्रकरण १९९६ मध्ये घडले होते. या खटल्याची सुनावणी १ एप्रिल २०२३ रोजी पूर्ण झाली. न्यायालयाने शनिवारी याचा निकाल जाहिर केला. त्यात अन्सारीला दोषी धरत दहा वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली.

मुख्तार सध्या बांदा कारागृहात आहे. गेल्यावर्षी अलाहाबाद उच्च न्यायालयाने सात वर्षांची शिक्षा ठोठावली. कारागृह अधिक्षकाला धमकवल्याचा, त्यांना शिवीगाळ केल्याचा मुख्तारवर आरोप होता. २००३ मध्ये ही घटना घडली होती. मुख्ताराने कारागृह अधिक्षकांना धमकावून सरकारी कामात अडथळा केला, असा ठपका ठेवण्यात आला होता. त्यानंतर मुख्तारला पाच वर्षांची शिक्षा आणि ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. मुख्तार एका गुंड टोळीचा प्रमुख होता. या टोळीने खून, दरोडा सारखे गंभीर गुन्हे केले आहेत, असा आरोप मुख्तारवर होता. त्यासाठी न्यायालयाने त्याला दोषी धरले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -