Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश ऑस्ट्रेलियामध्ये खलिस्तानींकडून हिंदू मंदिरांवर मोदी विरोधी घोषणा

ऑस्ट्रेलियामध्ये खलिस्तानींकडून हिंदू मंदिरांवर मोदी विरोधी घोषणा

Subscribe

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियातील मंदिरांवर हल्ल्याची प्रकरणे सातत्याने समोर येत आहेत. ब्रिस्बेन येथील स्वामी लक्ष्मीनारायण मंदिरावर नुकताच हल्ला झाला आहे. ऑस्ट्रेलिया टुडेच्या वृत्तानुसार, हा हल्ला खलिस्तानी समर्थकांनी केला असून या मंदिरांच्या भितींवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात घोषणा लिहिल्या आहेत. याआधी २१ फेब्रुवारीला रात्री ब्रिस्बेनमध्ये भारतीय वाणिज्य दुतावासावर हल्ला करण्यात आला होता.

मागील २ महिन्यात ऑस्ट्रेलियातील हिंदू मंदिरांवरील हल्ल्यांचे हे चौथे प्रकरण आहे. सर्वात आधी १२ जानेवारीला बीएपीएस स्वामीनारायण मंदिराच्या भितींवर भारताविरोधात घोषणा लिहिल्या होत्या. त्यानंतर १८ जानेवारीला मेलबर्नच्या श्री शिव विष्णु मंदिरात तोडफोड करण्यात आली होती. २३ जानेवारीला मेलबर्नच्या अल्बर्ट पार्क येथील इस्कॉन मंदिरात भारताविरोधी घोषणा लिहिल्या होत्या.

- Advertisement -

भारताच्या वाणिज्य दूतावासात खलिस्तानी झेंडा फेकला
माध्यमांच्या वृत्तानुसार, २१ फेब्रुवारीला रात्री खलिस्तानी समर्थकांनी वाणिज्य दूतावासावर हल्ला करताना खलिस्तानी झेंडा फेकला होता. २२ फेब्रुवारीला सकाळी काउन्सिलर अर्चना सिंह दूतावासात पोहचल्यानंतर त्यांनी खलिस्तानी झेंडा पाहिला आणि तात्काळ क्वीनलँड पोलिसांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी खलिस्तानी झेंडा ताब्यात घेतला.

हिंदुंना सावध राहण्याची गरज
ऑस्ट्रेलिया असोसिएशन ऑफ आयुर्वेदचे अध्यक्ष डॉ. नवीन शुक्ला यांनी सांगितले की, मेलबर्नमधील घटना पाहिल्यास हिंदू समुदायाला थोडे सावध राहावे लागेल. मेलबर्नमध्ये ज्या प्रकारे घटना घडत आहेत, त्यामुळे कॅनडा आणि अमेरिकेसारखी परिस्थिती इथेही उद्भवू शकते. त्यामुळे सरकारलाही याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे.
समुदायात सक्रीय असलेले भारतीय वंशाचे बलजिंदर सिंह म्हणतात की, अशा घटनांचा प्रभाव भारतातून येथे स्थायिक होणाऱ्या आणि अभ्यासासाठी आलेल्या विद्यार्थांवर पडेल. असे हल्ले करणारे लोक येथे राहणाऱ्या भारतीयांसाठी आणि भविष्यात येथे राहण्यासाठी येणाऱ्या भारतीयांसाठी समस्या निर्माण करू शकतात.

- Advertisement -

ऑस्ट्रेलियातील तिसऱ्या नंबरचा सर्वात मोठा हिंदू धर्म
हिंदू धर्म हा ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठा तिसऱ्या नंबरचा धर्म आहे. २०२१ च्या जनगणनेनुसार, ऑस्ट्रेलियामध्ये ६.८४ लाख हिंदू राहतात. हे ऑस्ट्रेलियातील लोकसंख्येच्या २.७ टक्के आहे. त्याचवेळी शीखांची संख्या २.०९ लाख आहे, जी एकूण लोकसंख्येच्या ०.८ टक्के आहे.
ऑस्ट्रेलियात राहणारे ३४ टक्के हिंदू १४ वर्षांचे आहेत आणि ६६ टक्के हिंदू ३४ वर्षांचे आहेत, ही खूप मोठी गोष्ट आहे. एवढेच नाही तर जुलै २०२२ च्या आकडेवारीनुसार ९६ हजार भारतीय विद्यार्थी ऑस्ट्रेलियात शिकत होते. परदेशी विद्यार्थ्यांची संख्या चीननंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे.

- Advertisment -