घरताज्या घडामोडीअँटिबायोटिक औषधांचा विषाणूंवर कोणताही प्रभाव नाही ; संशोधनातून आले समोर

अँटिबायोटिक औषधांचा विषाणूंवर कोणताही प्रभाव नाही ; संशोधनातून आले समोर

Subscribe

गेल्या दोन वर्षापासून संपूर्ण जग कोरोनाच्या विळख्यात अडकले आहे. कोरोनाचा धसका सर्वांनीच घेतला आहे. थोडं जरी बरं वाटलं नाही तरी लोकं डॉक्टरांना न विचारता औषधं घेतात. त्यासाठी मोठ्या प्रमाणात अँटिबायोटिक औषधांचे सेवन करतात. अँटिबायोटिकच्या परिणामकारकतेवरील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या संशोधनानुसार, 2019 मध्ये, औषधांना प्रतिसाद न देणाऱ्या जीवाणूंमुळे होणाऱ्या संसर्गामुळे जगभरात 1.2 दशलक्षाहून अधिक लोकांचा मृत्यू झाला.

गेल्या दोन वर्षापासून संपूर्ण जग कोरोनाच्या विळख्यात अडकले आहे. कोरोनाचा धसका सर्वांनीच घेतला आहे. थोडं जरी बरं वाटलं नाही तरी लोकं डॉक्टरांना न विचारता औषधं घेतात. त्यासाठी मोठ्या प्रमाणात अँटिबायोटिक औषधांचे सेवन करतात. अँटिबायोटिकच्या परिणामकारकतेवरील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या संशोधनानुसार, 2019 मध्ये, औषधांना प्रतिसाद न देणाऱ्या जीवाणूंमुळे होणाऱ्या संसर्गामुळे जगभरात 1.2 दशलक्षाहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. हा आकडा दरवर्षी मलेरिया किंवा एड्समुळे मरणाऱ्या लोकांच्या संख्येपेक्षा जास्त आहे.

किरकोळ संसर्गासाठी अँटिबायोटिकच्या अतिवापरामुळे गेल्या काही वर्षांत गंभीर संक्रमणांविरुद्ध अँटिबायोटिक कमी प्रभावी होत आहेत.लॅन्सेटमध्ये प्रकाशित झालेल्या कुचकामी अँटिबायोटिकमुळे होणाऱ्या मृत्यूंचा अंदाज लावणारा हा अहवाल 204 देशांमध्ये केलेल्या विश्लेषणानंतर तयार करण्यात आला आहे. या अहवालानुसार, दक्षिण आशियातील देशांमध्ये 2019 मध्ये AMR मुळे 389,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला म्हणजेच,अँटिबायोटिक औषधांचा विषाणूंवर कोणताही प्रभाव होत नाही.

- Advertisement -

अहवालानुसार, कोविड-19 मुळे मोठ्या संख्येने लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि अँटिबायोटिक्सचा वापर वाढला, त्यामुळे एएमआरचा धोका वाढला आहे. एएमआरमुळे होणारे बहुतेक मृत्यू हे न्यूमोनिया किंवा रक्तप्रवाहातील संसर्गासारख्या खालच्या श्वसन संक्रमणांमुळे होते.अँटिबायोटिकांच्या अकार्यक्षमतेबाबत यापूर्वीही चिंता व्यक्त करण्यात आली होती.


हे ही वाचा – Mumbai Corona Update : मुंबईत कोरोनाचे 5708 नवे रुग्ण; 12 रुग्णांचा मृत्यू

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -