घरताज्या घडामोडीMonkeypox treatment : मंकीपॉक्स व्हायरसवर सापडलं औषध, लॅन्सेट रिसर्चमधून मोठा खुलासा

Monkeypox treatment : मंकीपॉक्स व्हायरसवर सापडलं औषध, लॅन्सेट रिसर्चमधून मोठा खुलासा

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण जगभरात मंकीपॉक्स (Monkeypox Virus) या विषाणूची मोठ्या प्रमाणात दहशत वाढत आहे. युरोपीय (Europe) देशांसह अनेक भागांत मंकीपॉक्स व्हायरसचा धोका वाढत आहे. परंतु एक दिलासादायक गोष्ट म्हणजे मंकीपॉक्स व्हायरसवर औषध सापडलं आहे. त्यानुसार या धोकादायक आजारावर आता उपचार करता येणार आहे. लॅन्सेट रिसर्चमधून (Lancet Research) औषधाबाबत मोठा खुलासा करण्यात आला आहे.

लॅन्सेटने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार, अँटीव्हायरल (Anti-viral) औषधे मंकीपॉक्स या रोगातून लवकर बरे होण्यासाठी प्रभावी ठरू शकतात. ही औषधं लक्षणं कमी करू शकतात आणि रुग्णाला रोगातून लवकर बरे होण्यास मदत होईल. रुग्णांवर दोन औषधांचा वापर करण्यात आला. ही औषधे Brincidofovir आणि Tecovirimat आहेत.

- Advertisement -

मंकीपॉक्स व्हायरस रक्तात आणि लाळेमध्ये देखील आढळून आल्याचं संशोधकांनी म्हटलं आहे. या अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे, की याआधी मंकीपॉक्स इतक्या मोठ्या प्रमाणावर कधीच पसरला नव्हता. पण तरीही त्याचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होण्याचा धोका कमी आहे. महामारीच्या या नवीन उद्रेकाने ब्रिटनमध्ये पूर्वीपेक्षा जास्त रुग्णांना प्रभावित केलं आहे.

जगभरातील रुग्णांची संख्या सुमारे १०० वर पोहोचल्यानंतर WHO ने अलर्ट जारी केला आहे. आरोग्य महासंचालनालयाकडून खबरदारी घेण्याच्या केंद्राच्या सूचनेनंतर मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात येत असल्याचे राज्य निरीक्षण अधिकारी डॉ.विकासेंदू अग्रवाल यांनी सांगितले. प्रत्येक सामुदायिक आरोग्य केंद्रात नमुना संकलनाची व्यवस्था करण्यात येत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. येथून नमुने एनआयव्ही पुणे येथे पाठवले जातील.

- Advertisement -

देशात मंकीपॉक्स विषाणूसंदर्भात केंद्र सरकारकडून अलर्टही जारी करण्यात आला आहे. देशातील काही राज्यांमध्ये मंकीपॉक्स विषाणूचे संशोधन आधीच सुरू करण्यात आले आहे. तामिळनाडू, महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये मंकीपॉक्सबाबत सरकारकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे. महाराष्ट्रात मंकीपॉक्ससाठी बीएमसीने स्वतंत्र क्वारंटाईन केंद्र सुरू केले आहे. याशिवाय बीएमसीकडूनही त्यावर कडक नजर ठेवण्यात येत आहे.

गेल्या २१ दिवसांत परदेशातून प्रवास करून भारतात परतलेल्यांवरही नजर ठेवण्यात येत आहे. याशिवाय राजस्थानमध्ये मंकीपॉक्सबाबत माहिती मिळाली आहे की, याबाबत राज्य सरकारकडून आधीच कठोर कारवाई करण्यात आली आहे. राजस्थान सरकारकडून सांगण्यात आले आहे की, राज्यात मंकीपॉक्सचा संसर्ग झाल्यास, त्यांना वेगळं ठेवण्यासाठी आणि कडक देखरेखीसाठी तरतूद करण्यात आली आहे. तमिळनाडूमध्येही जगभरातील अनेक देशांमध्ये मंकीपॉक्स विषाणूच्या प्रसाराबाबत अलर्ट जारी करण्यात आला आहे.


हेही वाचा : Monkeypox Virus : कोरोनानंतर मंकीपॉक्स व्हायरसची दहशत, केंद्र सरकारकडून राज्यांना अलर्ट


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -