घरताज्या घडामोडीरेल्वेच्या डब्यात, एसी बसमध्ये होणार विषाणूनाशक तंत्रज्ञानाचा वापर, SARS-CoV-2च्या पार्श्वभूमीवर मोठं पाऊल

रेल्वेच्या डब्यात, एसी बसमध्ये होणार विषाणूनाशक तंत्रज्ञानाचा वापर, SARS-CoV-2च्या पार्श्वभूमीवर मोठं पाऊल

Subscribe

विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाद्वारे SARS-CoV-2च्या पार्श्वभूमीवर मोठं पाऊल पाऊल उचलण्यात आलं आहे. रेल्वेच्या डब्यात आणि एसी बसमध्ये आता विषाणूनाशक तंत्रज्ञानाचा वापर करता येणार आहे. SARS-CoV-2 आणि कोविड-१९ च्या विरोधात लढण्यासाठी रेल्वे, एसी बस आणि इतर बंद परिसरामध्ये या तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सोमवारी यासंदर्भात माहिती दिली आहे.

विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री सिंह यांनी सांगितलं की, वैज्ञानिक आणि औद्योगिक अनुसंधान परिषद निर्वाचन आयोगाला एक पत्र लिहिण्यात आलंय. यामध्ये पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी आणि इतर परिसरामध्ये या तंत्राचा वापर केला जाणार आहे. कोरोना महामारीमुळे काही दिवसांसाठी रॅली आणि रोड शोवर निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यामुळे हे मोठं पाऊल उचलण्यात आलंय.

- Advertisement -

पुढे ते म्हणाले की, रेल्वेगाडीचे डबे, एसी बस आणि संसद भवनाच्या परिसरात विषाणूनाशक तंत्रज्ञानाचा वापर केला गेला आहे आणि सामान्य नागरिकांसाठी याची सुरूवात केली जाणार आहे. सीएसआयआर-सीएसआयओच्या माध्यमातून मंत्रालयद्वारे विकसित अल्ट्राव्हायलेट-सी प्राद्योगिक सार्स-सीओव्ही-२ हवेतील संक्रमणापासून रोखण्यासाठी आणि कोविड-१९ वर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठी मदत होणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा : पीएम मोदींच्या भाषणात अडथळा, टेलिप्रॉम्प्टरलाही खोटं सहन झालं नाही ; राहुल गांधींची मोदींवर टीका


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -