घरदेश-विदेशऑस्करसाठी गरिबी आणि माकडं विकणार? - अनुपम खेर

ऑस्करसाठी गरिबी आणि माकडं विकणार? – अनुपम खेर

Subscribe

अभिनेते अनुपम खैर यांनी ऑस्कर पुरस्कारांबाबत परखड मत व्यक्त केलं आहे. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी ऑस्करसाठी भारतानं किती दिवस देशातील गरिबी, माकडं आणि हत्ता दाखवायचे? असा सवाल केला आहे.

अभिनेते अनुपम खैर यांनी ऑस्कर पुरस्कारांबाबत परखड मत व्यक्त केलं आहे. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी ऑस्करसाठी भारतानं किती दिवस देशातील गरिबी, माकडं आणि हत्ता दाखवायचे? असा सवाल केला आहे. किती दिवस आपण देशातील गरिबी, मागासलेपणा आणि वर्गभेद विकणार आहोत? आपण केवळ माकडे, हत्तीच विकणार का? आणि ते किती दिवस विकायचे? असा सवाल त्यांनी यावेळी केला आहे. द अॅक्सीटेंडल प्राईम मिनिस्टर या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान त्यांनी चित्रपटांतील विषयांवर आणि ऑस्करबाबत मत मांडलं आहे. द अॅक्सीटेंडल प्राईम मिनिस्टर हा चित्रपट देशातील सध्याचं राजकारण दाखवतो. ज्यामध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा बारकाईनं अभ्यास केलेला दिसून येईल. असं देखील अनुपम खैर यांनी म्हटलं आहे.

चित्रपटावरून वाद

द अॅक्सीटेंडल प्राईम मिनिस्टर हा चित्रपट माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचे मीडिया अॅडव्हायझर संजय बारू यांच्या पुस्तकावर आधारीत आहे. यामध्ये मनमोहन सिंह पंतप्रधान झाल्यापासूनचा प्रवास दाखवला गेला आहे. दरम्यान, चित्रपटाच्या ट्रेलरवरून काँग्रेसनं आक्षेप घेत कोर्टात धाव घेतली आहे. या चित्रपटामध्ये राहुल गांधी आणि सोनिया गांधी कशा प्रकारे हस्तक्षेप करतात? मनमोहन सिंह यांची कारकिर्द कशी होती. या गोष्टी दाखवण्यात आल्या आहे. काँग्रेसनं मात्र यावर जोरदार आक्षेप घेतला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -