‘हा स्वतंत्र भारताचा सिंह आहे’, अशोकस्तंभावरून अनुपम खेर यांची पोस्ट चर्चेत

अशोक स्तंभावर असलेल्या सिहांच्या मुद्रेवरील भाव हे शांत आणि संयमी असल्याचे दिसते तर, संसद भवनाच्या इमारतीवरील अशोक स्तंभावर असलेल्या सिहांची मुद्रा ही क्रोधीत आणि आक्रमक दिसते आहे असं काहींचं मत आहे. एकूणच सोमवार पासून सुरु असलेल्या या सर्व वादावर हिंदी सिने सृष्ष्टीतील जेष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी स्वतःचे मत व्यक्त केले.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र(narendra modi) मोदी यांच्या हस्ते सोमवारी ११ जुलै रोजी संसद भवनाच्या इमारतीवरील अशोक स्तंभाचे अनावरण करण्यात आले आणि त्यांनतर एका वेगळ्याच वादाला तोंड फुटले. अशोक स्तंभावर असलेल्या सिहांच्या चेहऱ्यावरील भावमुद्रेवरून एक नवा वादंग निर्माण झाला आहे. भाजपच्या(bjp) नेतृत्वातील केंद्रसरकारवर अशोक स्तंभावरून टीका केली जात आहे. अशोक स्तंभावर असलेल्या सिहांच्या मुद्रेवरील भाव हे शांत आणि संयमी असल्याचे दिसते तर, संसद भवनाच्या इमारतीवरील अशोक स्तंभावर असलेल्या सिहांची मुद्रा ही क्रोधीत आणि आक्रमक दिसते आहे असं काहींचं मत आहे. एकूणच सोमवार पासून सुरु असलेल्या या सर्व वादावर हिंदी सिने सृष्ष्टीतील जेष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी स्वतःचे मत व्यक्त केले. त्याच संदर्भात अभिनेते अनुपान खेर(anupam kher) यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट सुद्धा शेअर केली आहे आणि ही पोस्ट सुद्धा चर्चेत आली आहे.

हे ही वाचा – राष्ट्रपतींच्या पलायनानंतर श्रीलंकेतील परिस्थिती आणखी चिघळली; आणीबाणी जाहीर

अनुपम खेर यांचे ट्वीट

अनुपान खेर(anupam kher) यांनी शेअर केलेल्या ट्वीट मध्ये, त्यांनी अशोक स्तंभाचा विडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओला त्यांनी एक लक्षवेधी कॅप्शन सुद्धा दिले आहे. त्यात अनुपम खेर म्हणाले, ‘अरे भावांनो, सिंहाला जर दात असतील तर ते दिसणारच ना, हा स्वतंत्र भारताचा सिंह आहे. गरज पडली तर चावा देखील घेऊ शकतो. जय हिंद.’ अभिनेते अनुपम खेर यांच्या या ट्वीटने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

हे ही वाचा – इलॉन मस्कवर ट्विटरकडून कायदेशीर कारवाई, तर इलॉन मस्क यांची प्रतिक्रिया

नेत्यांनीही केली टीका

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा, खासदार जवाहर सरकार, लेखक आणि विचारवंत दिलीप मंडल, आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी संसद भवनाच्या इमारतीवरील अशोक स्तंभासंदर्भात(ashok stamabh) ट्वीट शेअर करून या अशोक स्तंभावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. संसदेच्या इमारतीवर असलेला अशोक स्तंभ २०फूट उंच असून ९५०० किलो वजनाचा असून हे अशोक स्तंभ तांब्यापासून घडविलेले आहे.

हे ही वाचा – नवा अशोक स्तंभ आक्रमक आणि रागीट, राष्ट्रीय चिन्हाचा अपमान झालाय; तृणमूलच्या खासदाराची…