Eco friendly bappa Competition
घर क्रीडा Wrestlers Protest : क्रीडामंत्र्यांच्या चर्चेनंतर कुस्तीपटूंवरील गुन्हे मागे, WFIच्या निवडणुका कधी?

Wrestlers Protest : क्रीडामंत्र्यांच्या चर्चेनंतर कुस्तीपटूंवरील गुन्हे मागे, WFIच्या निवडणुका कधी?

Subscribe

भाजपचे खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्याविरोधात महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचा आरोप केला आहे. या प्रकरणी महिलांनी दिल्लीच्या जंतरमंतरवर २३ एप्रिल रोजी आंदोलन करण्यास सुरूवात केली. यावेळी देशभरातून आणि क्रीडाक्षेत्रातून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. याविरोधात कुस्तीपटूंनी केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांची भेट घेतली होती. यांच्यामध्ये जवळपास ५ तासांपर्यंत बैठक सुरू होती. या बैठकीत क्रीडामंत्र्यांनी कुस्तीपटूंना आंदोलन स्थगित करण्यास सांगितलं. त्यानंतर १५ जूनपर्यंत आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय कुस्तीपटूंनी घेतला आहे. मात्र, WFIच्या येत्या ३० जूनपर्यंत निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विनेश फोगाट, साक्षी मलिक आणि बजरंग पूनिया यांच्या नेतृत्वाखाली कुस्ती संघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्याविरोधात आंदोलन करत आहेत. कुस्तीपटूंनी बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. सिंह यांच्या अटकेच्या मागणीवर ते ठाम आहेत. दिल्ली पोलिसांकडून बृजभूषण सिंह यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच या प्रकरणांचा तपास देखील सुरू आहे.

- Advertisement -

वास्तविक, अनुराग ठाकूर यांनी कुस्तीपटूंना चर्चेसाठी बोलावले होते. ठाकूर यांचे आमंत्रण स्वीकारून ऑलिम्पिक पदक विजेता बजरंग पूनिया, साक्षी मलिक आणि तिचे पती सत्यव्रत कादियान, जितेंद्र किन्हा यांनी बैठकीला हजेरी लावली होती. यावेळी कुस्तीपटूंनी प्रामुख्याने तीन मागण्या सरकारच्या समोर ठेवल्या होत्या.

काय आहेत तीन मागण्या?

१) बृजभूषण सिंह यांना अटक करण्यात यावी.
२) कुस्ती संघटनेची निवडणूक निष्पक्ष व्हावी. बृजभूषण सिंह यांच्या कुटुंबातील एकही सदस्य कुस्ती संघटनेत नसावा, अशी मागणी कुस्तीप्रेमींनी केली आहे.
३) २८ मे रोजी कुस्तीपटूंवर झालेले गुन्हे मागे घ्यावेत.

बजरंग पूनिया काय म्हणाला?

- Advertisement -

अनुराग ठाकूर यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर बजरंग पूनिया याने पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, आम्ही या बैठकीत काही मुद्द्यावर चर्चा केली. पोलीसांची चौकशी ही १५ जूनपर्यंत पूर्ण होईल. क्रीडा मंत्र्यांनी आम्हाला विनंती केली की, तोपर्यंत तुम्ही तुमचे आंदोलन स्थगित करा.


हेही वाचा : कुस्तीपटूंचे आंदोलन तूर्तास स्थगित, ‘या’ तारखेपर्यंत दिली मुदत; अन्यथा


 

- Advertisment -