घरताज्या घडामोडीअनुष्का शर्माची डुप्लिकेट पाहिलीत का ?

अनुष्का शर्माची डुप्लिकेट पाहिलीत का ?

Subscribe

या जगात प्रत्येक व्यक्तीची हुबेहुब नक्कल असणारी दुसरी व्यक्ती जगात कुठेतरी असतेच असे म्हटले जाते. त्यातही बॉलीवूड किंवा सेलिब्रिटीजचे डुप्लिकेट असतातच. आतापर्यंत यात सलमान, ऐश्वर्या, माधुरी दिक्षित, प्रियांका चोप्रा, ऋतिक रोशन यांचे डुप्लिकेट बऱ्याचजणांना माहित आहेत. पण आता अनुष्का शर्माचीही डुप्लिकेट लोकांनी शोधून काढली आहे. ही दुसरी तिसरी कोणती तरुणी नसून अमेरिकन सिंगर ‘ज्युलिया मायकल’ आहे.

- Advertisement -

पंचविशीची ज्युलिया आणि अनुष्का यांच्यात कमालीचे साम्य असून दोघींचे वागणे, बसणे, बोलणेही हुबेहुब आहे. यामुळे अनुष्का ज्युलियाची कॉपी करते की ज्युलिया अनुष्काची असा प्रश्न दोघींच्या चाहत्यांना पडला आहे. ज्युलियाचे फोटो व्हायरल झाले आहेत. ज्युलिया फक्त गाणी गात नसून ती गाणीही लिहते. ब्रिटनी स्पीयर्स, सेलेना गोमेज आणि ग्वेन स्टेफनी यासारख्या नामांकीत व्यक्तींबरोबर ज्युलियाने काम केले आहे. साँग ऑफ द ईयर आणि बेस्ट न्यू आर्टीस्ट कॅटेगरीत ग्रॅमी अवार्डससाठी ज्युलियाचे नामांकन करण्यात आले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -