घरदेश-विदेशहिंमत असेल तर समोरून वार करा; सुब्रमण्यम स्वामींचे राहुल गांधींना आवाहन

हिंमत असेल तर समोरून वार करा; सुब्रमण्यम स्वामींचे राहुल गांधींना आवाहन

Subscribe

राहुल गांधींवर आक्षेपार्ह शेरेबाजी केल्या प्रकरणी स्वामींवर खटले दाखल

भाजपाचे जेष्ठ नेते आणि राज्यसभा सदस्य सुब्रमण्यम स्वामी यांनी पुन्हा एकदा काँग्रेसचे पूर्व अध्यक्ष राहुल गांधींवर टीका केली आहे. राहुल गांधींवर आक्षेपार्ह शेरेबाजी केल्या प्रकरणी काँग्रेस पक्षातील विविध राज्यातील नेते आणि कार्यकर्त्यांनी स्वामींवर खटले दाखल केले आहेत.

सुब्रमण्यम स्वामींचे राहुल गांधींना खुले आवाहन

या सर्व प्रकरणावर प्रकाश टाकताना सुब्रमण्यम स्वामी यांनी राहुल गांधींना खुले आवाहन दिले आहे. आपल्या ट्विटर संदेशात ते म्हणाले,” माझ्यावर दाखल केले जाणारे गुन्हे कोणाच्या सांगण्यावरून होत आहेत याची मला पूर्ण जाणीव असून हिमंत असल्यास राहुल गांधींनी दिल्लीत स्वतःच्या नावावर तक्रार दाखल करावी म्हणजे मी सुद्धा अनेक सत्य बाहेर काढील . ”

- Advertisement -

राहुल गांधी कोकेनचे सेवन करतात म्हणून पक्षाची ही स्थिती 

मागील आठवड्यात सुब्रमण्यम स्वामी यांनी राहुल गांधींवर केलेल्या वक्त्यव्यमुळे त्यांच्या विरुद्ध देशभरात ३९ एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवाच्या कारणांवर बोलताना स्वामी म्हणाले की, ”राहुल गांधी कोकेनचे सेवन करतात म्हणून आज पक्षाची ही स्थिती आहे. स्वामींच्या या वक्तव्यावर काँग्रेसने तीव्र आक्षेप घेतला असून स्वामींच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आली होती .”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -