Apple चा सर्वात स्वस्त iPhone मार्चमध्ये लॉंच होण्याची शक्यता, जाणून घ्या फीचर्स

Apple च्या iPhone लॉन्चिंगचा कार्यक्रम प्रत्येक वर्षातील सप्टेंबर महिन्यात आयोजित केला जातो. परंतु यंदाच्या २०२२ वर्षात अॅपल कंपनी सप्टेंबर महिन्याच्या आधीच iPhone लॉन्च करणार असल्याची शक्यात वर्तवली जात आहे. अॅपल मार्च महिन्यात एक कार्यक्रम आयोजित करणार असल्याचं सांगितलं जातंय. जरी या कंपनीने iPhone 14 सीरीज लॉन्च केलंलं नसलं तरी iPhone SE 3 लॉन्च करण्याची शक्यता आहे.

iPhone SE 3 2022 शी संबंधित माहिती मिळाली असली तरी भारतीय बाजारपेठेच्या दृष्टीने हा फोन खूप महत्त्वाचा ठरू शकतो. कारण भारतात अद्यापही लोकं स्वस्त आयफोन खरेदी करण्यासाठी इच्छुक आहेत. जर iPhone SE 3 लाँच झाला तर Apple चा फ्लॅगशिप चिपसेट A15 Bionic यामध्ये दिलं जाऊ शकतं.

काय आहेत फिचर्स ?

Apple iPhone SE 3 मध्ये ४.७ इंचाचा LCD डिस्प्ले दिला जाऊ शकतो. त्यामध्ये कंपनी iPhone SE मध्ये फेस आयडी सारखं फिचर्सचा यामध्ये समावेश होऊ शकतो. तसेच iPhone SE 3 ला 5G सपोर्ट करू शकतो.

iPhone SE 3 मध्ये १२ मेगापिक्सलचा वाईड अँगल कॅमेरा असणार आहे. तसेच ७ मेगापिक्सलचा फ्रन्ट कॅमेरा देखील या मोबाईमध्ये दिला जाणार आहे. तसेच अॅपल कंपनी भारतात हा मोबाईल फोन ३० किंवा ३५ हजार रूपयांमध्ये लॉन्च करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.


हेही वाचा : मुंबईतील लेदरच्या गोदामाला भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल