घरटेक-वेकApple Down : ॲपलच्या सेवा काही काळ ठप्प; App Store, Music, Podcasts...

Apple Down : ॲपलच्या सेवा काही काळ ठप्प; App Store, Music, Podcasts सह अनेक ॲप्सवर परिणाम

Subscribe

जगप्रसिद्ध टेक कंपनी ॲपलच्या (Apple) अनेक सेवा सोमवारी रात्री उशिरा ठप्प झाल्या. यामुळे जगभरातील युजर्स ॲपलच्या कोणत्याच सेवेचा वापर करु शकले नाहीत. जगातील अनेक भागात ॲपलच्या सेवांवर याचा परिणाम झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र ॲपलने आता या सेवा पुर्ववत केल्या आहेत. Apple Music, Apple TV+, App Store, Podcasts, Contacts आणि Apple Arcade या कंपनीच्या वेब-आधारित सेवा आउटेजमुळे प्रभावित झाल्या होत्या.

ॲपल सर्व्हिस अप-टाइम डॅशबोर्डनुसार, भारतातील युजर्सना iCloud चे काही फीचर्स वापरताना अडचणी येत होत्या. तर भारतातील ॲपल युजर्सना Apple Maps आणि Find My Network सारख्या सेवा वापरणे कठीण जात होते. विशेषत: कॅलेंडर, कॉन्टॅक्ट्स आणि प्रायव्हेट Relay सारख्या सेवांवर याचा परिणाम जाणवत होता. जगभरातील अनेक ॲपल युजर्सना सेवा वापरताना अडचणी येत होत्या. त्यामुळे सोशल मीडियावरही युजर्स ॲपलची सेवा डाऊन अशी माहिती देत होते. मात्र ॲपल कंपनीने या सर्व सेवा पुर्ववत केल्याचे म्हटले आहे.

- Advertisement -

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, सोमवारी नेटवर्क आउटेजमधील बिघाड दुरुस्त करण्यात आला आहे. या आउटेजमुळे Apple Music, iCloud आणि App Store ऑफलाइन झाले होते. यामुळे आयफोन आणि अॅपलच्या इतर युजर्सशिवाय कॉर्पोरेट युजर्सनाही या आउटेजचा मनस्ताप सहन करावा लागला.

रिपोर्टनुसार, ॲपल कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले की, ही समस्या डोमेन नेम सिस्टम म्हणजेच DNS ची समस्या होती. जेव्हा इंटरनेट प्रोटोकॉल ॲड्रेस कनेक्ट होऊ शकत नाही त्यावेळी DNS फेल होण्याची समस्या उद्भवते. ॲपलच्या डॅशबोर्डनुसार, युजर्सव्यतिरिक्त कंपनीच्या अंतर्गत सेवांवरही याचा परिणाम जाणवला. युजर्सना iCloud अकाऊंटमध्ये साइन-इन करण्यात अडचणी येत होत्या, परंतु आता ॲपलने सर्व सेवा पुर्ववत केल्याचे सांगत युजर्स आता त्या वापरू शकतात हे स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

Apple युजर्सनी US वेळेनुसार दुपारी 12 वाजता सेवा बंद असल्याच्या तक्रारी सुरू केल्या. अॅपलच्या सेवांमध्ये या प्रकारची समस्या क्वचितच दिसून येते. मात्र, सोमवारी केवळ अॅपलच नव्हे तर अमेझॉनच्या सेवांबाबतही युजर्स तक्रारी करत होते.


Maharashtra Budget Session 2022 Live Update : कर्नाटक सीमावाद सोडवण्यासाठी विधान परिषदेत प्रस्ताव मांडण्यात येणार – दरेकर


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -