घरदेश-विदेशNIAच्या अतिरिक्त महासंचालकपदी अतुलचंद्र कुलकर्णी यांची नियुक्ती

NIAच्या अतिरिक्त महासंचालकपदी अतुलचंद्र कुलकर्णी यांची नियुक्ती

Subscribe

केंद्रीय गृह मंत्रालयाने वरिष्ठ आयपीएस अधिकारी अतुलचंद्र कुलकर्णींना प्रतिनियुक्तीवर NIAच्या अतिरिक्त महासंचालकपदी नियुक्त करण्यात आले आहे. वरिष्ठ आयपीएस अधिकारी कुलकर्णी वरिष्ठ आयपीएस अधिकारी कुलकर्णी महाराष्ट्राच्या कारागृह विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक होते. केंद्रीय गृह मंत्रालयाने आज त्यांच्या नियुक्तीचा आदेश जारी केला आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाने महाराष्ट्र सरकारला कुलकर्णी यांना तत्काळ कार्यमुक्त करण्याचा आदेश दिला आहे. देश पातळीवरील दहशतवादी कारवायांना प्रतिबंध आणि तपास करण्याचे काम या राष्ट्रीय तपास संस्थेकडे आहे. कुलकर्णी यांनी सात वर्षे ‘आयबी’ मध्ये काम केले आहे. प्रामुख्याने ईशान्य भारतात त्यांची ‘आयबी’त सेवा झाली आहे. त्याचाही त्यांना आता NIA मध्ये उपयोग होणार आहे.

- Advertisement -

कुलकर्णी हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील असून 1990 च्या बॅचचे महाराष्ट्र केडरचे आयपीएस अधिकारी आहेत. पोलीस दलात नांदेड येथे सहायक अधीक्षक म्हणून ते रुजू झाले होते. त्यांनी अतिरिक्त पोलीस अधीक्षक जळगाव आणि भंडारा येथे पोलीस अधीक्षक म्हणून काम केले आहे. नागपूर येथे नक्षलविरोधी मोहिमेतही त्यांचा सहभाग राहिला आहे. त्यांनी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, मुंबईमध्ये सह पोलिस आयुक्त या पदावर काम केले आहे. येरवडा तुरुंगाचे अप्पर पोलीस महासंचालक सुधारसेवा असताना त्यांनी कैद्यांसाठी विविध उपक्रम सुरु केले होते.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -