घरदेश-विदेशडब्लूएचओकडून भारतीय लसींचे कौतूक

डब्लूएचओकडून भारतीय लसींचे कौतूक

Subscribe

ग्लोबल बायो इंडिया २०२१ कार्यक्रमात गौरवोद्गार

भारताने कोविड १९ विषाणू प्रतिबंधक लशीचा जागतिक दर्जाचा उत्पादक म्हणून मिळवलेली क्षमता व वेळोवेळी नवप्रवर्तनाचे केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत, अशा शब्दांत जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्लूएचओ)मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन यांनी कोविड काळातील भारताच्या कामगिरीची प्रशंसा केली आहे.

ग्लोबल बायो इंडिया २०२१ या कार्यक्रमात त्यांनी सांगितले की, करोना साथीविरोधातील लढाई आता महत्त्वाच्या टप्प्यात असून अचानक युरोप व अमेरिकेत रुग्ण पुन्हा वाढत आहेत.  अनेक अनिश्चिततांचे सावट असून विषाणूचे वेगवेगळ्या  उत्परिवर्तनाचा समावेश असलेले प्रकार सामोरे येत आहेत. भारताने कोविड १९ विषाणू विरोधात लस निर्मितीत जागतिक दर्जाचा उत्पादक म्हणून नाव कमावले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -