घरट्रेंडिंगApril Fool's Day 2023 : 'एप्रिल फूल डे' का साजरा केला जातो?...

April Fool’s Day 2023 : ‘एप्रिल फूल डे’ का साजरा केला जातो? ‘हा’ आहे इतिहास

Subscribe

1 एप्रिल हा दिवस भारतासह संपूर्ण जगात दरवर्षी 'एप्रिल फूल डे' म्हणून साजरा केला जातो. अनेक देशांमध्ये हा दिवस सुट्टीचाही असतो.

दरवर्षी 1 एप्रिल हा दिवस जगभरात ‘एप्रिल फूल’ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी अनेकजण आपल्या मित्र-मैत्रिणींना किंवा प्रिय व्यक्तींना आश्चर्यचकित करण्यासाठी काहीही खोटं सांगतात आणि नंतर एप्रिल फूल बनवल्याचं सांगतात. अश्या प्रकारचे हास्यविनोद, मजा-मस्ती या दिवशी केली जाते. आज आम्ही तुम्हाला या दिवसाची सुरुवात कशी झाली हे सांगणार आहोत.

‘एप्रिल फूल डे’चा इतिहास

11 easy April Fools' Day pranks, if you need a lil fun to brighten your day | Mashable

- Advertisement -

आपण 1 एप्रिल हा ‘एप्रिल फूल डे’ म्हणून का साजरा करतो याविषयी विविध कथा सांगितल्या जातात. मात्र, सर्वात प्रचलित कथांपैकी एक म्हणजे ज्युलियन कॅलेंडर. काही इतिहासकार सांगतात की, एप्रिल फूलचा इतिहास आजपासून सुमारे 440 वर्षे जुना आहे. जेव्हा 1582 मध्ये फ्रान्सने ग्रेगोरियन कॅलेंडरसह जुनियन कॅलेंडर बदलले. ज्युलियन कॅलेंडरमधील नवीन वर्ष 1 एप्रिलपासून सुरू झाले. तर ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये तो 1 जानेवारी असा झाला. कॅलेंडर बदलूनही अनेक जण 1 एप्रिललाच नवीन वर्ष साजरे करत होते, त्यांचा उत्सव मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू व्हायचा आणि 1 एप्रिलपर्यंत चालायचा. त्यामुळे ते चेष्टेचा विषय बनले आणि तेव्हापासून 1 एप्रिल हा दिवस एप्रिल फूल म्हणून ओळखला जाऊ लागला.

‘या’ देशात साजरा केला जातो एप्रिल फूल

  • 1 एप्रिल हा दिवस भारतासह संपूर्ण जगात दरवर्षी ‘एप्रिल फूल डे’ म्हणून साजरा केला जातो. अनेक देशांमध्ये हा दिवस सुट्टीचाही असतो.

April Fools Day: The story behind the celebration | SBS Greek

- Advertisement -
  • ग्रीसमध्ये असा समज आहे की, जर तुम्ही या दिवशी एखाद्याला एप्रिल फूल बनवले तर तुम्हाला संपूर्ण वर्ष चांगले जाईल.
  • फ्रान्समध्ये या दिवसाला त्यांच्या भाषेत ‘पॉयझन डी’इव्हिल’ म्हणतात.

April Fools Day Around the World - Days to Come

  • स्कॉटलँड पहिले दोन दिवस ‘एप्रिल फूल डे’ साजरा करतात. पहिला दिवस अफवा पसरवून लोकांना मूर्ख बनवून साजरा केला जातो. दुसऱ्या दिवशी लोक एकमेकांच्या मागे शेपूट लावतात.

April Fool's Day | LearnEnglish

  • फ्रान्स, इटली, बेल्जियममध्ये लोकांच्या पाठीवर कागदी मासे चिकटवण्याची प्रथा आहे. त्याला एप्रिल फिश असेही म्हणतात.

हेही वाचा :

Surya Grahan 2023 : एप्रिल महिन्यात असणार वर्षातील पहिले सूर्यग्रहण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -