घरदेश-विदेशकोरोनामुळे एप्रिलमध्ये होणारी JEE MAIN परीक्षा स्थगित

कोरोनामुळे एप्रिलमध्ये होणारी JEE MAIN परीक्षा स्थगित

Subscribe

जेईई परीक्षांचा नव्या तारखा परीक्षा घेण्याआधी कमीत कमी १५ दिवसाआधी जाहीर करण्यात येतील. 

देशात वाढत्या कोरोना संसर्गामुळे एप्रिलमध्ये होणारी जेईई मेन (JEE MAIN) परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यंदा २७, २८ आणि ३० एप्रिल २०२१ या तीन दिवसांत जेईईच्या परीक्षा घेण्यात येणार होत्या, मात्र देशात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे सुरक्षेच्या कारणास्तव परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. याबाबत नॅशनल टेस्टिंग एजेन्सी (NTA)ने स्पष्टीकरण दिले की, जेईई परीक्षांचा नव्या तारखा परीक्षा घेण्याआधी कमीत कमी १५ दिवसाआधी जाहीर करण्यात येतील.

एप्रिलमध्ये होणाऱ्या जेईई मेन (JEE MAIN’S) परीक्षांचा हा तिसरा अटेंम्पट होता. मात्र कोरोना महामारीमुळे जेईई परीक्षांवरही परिणाम झाला. जवळपास ६ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी इंजिनियरिंग प्रवेश परीक्षासाठी बसणार होते. मार्चमध्ये झालेल्या अटेंम्पटला ६ लाख ५२ हजार विद्यार्थ्यांनी या परीक्षांसाठी अर्ज केला होता. परंतु यातील ६ लाख १९ हजार ६३८ विद्यार्थींच उपस्थित राहू शकले.

- Advertisement -

जेईई मेन बीई, बीटेकसह आयआयआयटी, एनआयटी आणि इतर अनेक महाविद्यालयांमध्ये पदवी स्तराचा अभ्यासक्रम आहे. जेईई मेन क्रॅस करत २.५ रँकपर्यंत पोहचणाऱ्यांनाच आयआयटी प्रवेशासाठी जेईई ए़डवांस (ADVANCE) प्रवेश परीक्षेत भाग घेण्यासाठी निवडले जाते. मात्र मागील वर्षीदेखील कोरोना संसर्गामुळे प्रवेश प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -