Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश बलुचिस्तानात चिनी अभियंत्यांवर सशस्त्र हल्ला, हल्लेखोरांसह 15 जण ठार झाल्याचा दावा

बलुचिस्तानात चिनी अभियंत्यांवर सशस्त्र हल्ला, हल्लेखोरांसह 15 जण ठार झाल्याचा दावा

Subscribe

क्वेट्टा : पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात रविवारी चिनी अभियंत्यांच्या ताफ्यावर सशस्त्र बंडखोरांनी हल्ला केला. दोन तासांपेक्षा जास्त काळ चाललेल्या या चकमकीत चार चिनी नागरिक आणि 9 पाकिस्तानी सैनिक ठार केल्याचा दावा फुटीरतावादी संघटना बलुच लिबरेशन आर्मीने केला आहे, असे द बलुचिस्तान पोस्टने म्हटले आहे. याच्या प्रत्युत्तरादाखल केलेल्या हल्ल्यात दोन हल्लेखोरही ठार झाले आहेत.

- Advertisement -

बलुचिस्तानच्या ग्वादरमधील फकीर कॉलनीजवळ हा दहशतवादी हल्ला झाला. ग्वादरमध्ये चिनी अभियंत्यांवर झालेल्या हल्ल्याला सरकारी अधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला आहे. चिनी अभियंत्यांच्या ताफ्यावर सकाळी साडेनऊच्या सुमारास हल्ला झाला आणि सुमारे दोन तास गोळीबार सुरू होता, असे बलुचिस्तान पोस्टने म्हटले आहे.

हेही वाचा – देशद्रोही निर्मात्यांना लाजा… सीमा हैदरच्या चित्रपटाला मनसेचा विरोध

- Advertisement -

बलुच लिबरेशन आर्मीने (बीएलए) या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, सुरक्षा अधिकाऱ्यांनी शहराला हाय अलर्टवर ठेवले आहे. परिसरात प्रवेश करण्यावर तसेच बाहेर जाण्यावर प्रतिबंध घालण्यात आले आहेत. चार चिनी नागरिक आणि 9 पाकिस्तानी सैनिक ठार केल्याचा दावा फुटीरतावादी संघटना बलुच लिबरेशन आर्मीने केला आहे.

हेही वाचा – NIA Raids : महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये पीएफआयच्या छुप्या ठिकाणांवर एनआयएची छापेमारी

विशेष म्हणजे, गेल्या वर्षी मे महिन्यात, कराची विद्यापीठातील चीन-निर्मित कन्फ्यूशियस संस्थेच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या मिनीबसवर बुरखा घातलेल्या बलूच महिलेने केलेल्या आत्मघाती हल्ल्यात तीन चिनी शिक्षकांसह चार जण ठार झाले होते. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने (बीएलए) या हल्ल्याची देखील जबाबदारी स्वीकारली होती. पाकिस्तानमध्ये कार्यरत असलेल्या चीनच्या नागरिकांवर गेल्या वर्षी झालेला हा पहिला मोठा हल्ला होता.

- Advertisment -