Homeक्राइमArms license : यांचा काही नेम नाही! भाजपाशासित राज्यांमध्ये सर्वाधिक शस्त्रपरवाने, काय...

Arms license : यांचा काही नेम नाही! भाजपाशासित राज्यांमध्ये सर्वाधिक शस्त्रपरवाने, काय सांगते आकडेवारी?

Subscribe

एकट्या ठाणे शहरात जवळपास चार हजार शस्त्र परवानाधाकरक असल्याचे ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यानी सांगितले होते. तर, पुणे शहरात सहा हजार 300 परवाने जारी करण्यात आल्याचे स्पष्ट झाले होते.

(Arms license) मुंबई : सध्या महाराष्ट्राचे राजकारण परभणी आणि बीड भोवती फिरत आहे. त्यातही बीडवरून मंत्री धनंजय मुंडे यांना विरोधकांकडून लक्ष्य केले जात आहे. बीड जिल्ह्यात 1,222 शस्त्र परवाने कशासाठी आणि कोणाच्या आशीर्वादाने देण्यात आले, असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपस्थित केला आहे. या पार्श्वभूमीवर माहिती घेतली असता, मोठ्या प्रमाणावर शस्त्र परवाने वितरीत केलेल्या पहिल्या आठपैकी पाच राज्यांमध्ये भाजपा सरकार आहे. (Highest number of arms licenses in BJP-ruled states)

अंजली दमानिया यांनी अलीकडेच एक व्हिडीओ ट्वीट करून बीडमधील शस्त्र परवानाधारकांची यादी दिली होती. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टममाइंड समजला जाणारा वाल्मीक कराड याच्या नावावर शस्त्र परवाना असल्याची नोंद आहे. तर त्याचेच साथीदार असलेले कैलाश फड आणि निखील फड यांच्याकडे शस्त्र परवाना नाही, मात्र त्यांच्याकडे शस्त्र असल्याचा दावा दमानिया यांनी केला आहे.

हेही वाचा – Crimes in Beed : बीडमधील गुन्ह्यांचा आलेख चढताच, अवघ्या 10 महिन्यांत 36 खून अन् 156 अत्याचार

बीड जिल्ह्यातील 1,222 लोकांकडे शस्त्र परवाना असल्याची अधिकृत नोंद आहे. एवढ्या लोकांना बंदुका देण्याचे कारण काय आहे? सोमनाथ सूर्यवंशी यांचा कोठडीत झालेल्या संशयास्पद मृत्यू मुळे परभणी देखील सध्या चर्चेत आहे. या जिल्ह्यात फक्त 32 जणांकडे शस्त्र परवाना आहे. तर अमरावती ग्रामीण मध्ये 243 जणांकडे शस्त्राचे परवाने आहेत. याच्या दुप्पट, तिप्पट शस्त्र परवाने बीडमध्ये का आणि कोणाच्या आशीर्वादाने दिले गेले, असा संतप्त सवाल दमानिया यांनी उपस्थित केला.

याबाबत आणखी माहिती घेतली असता, उल्हासनगरमधील पोलीस ठाण्यात भाजपाचे माजी गणपत गायकवाड यांनी 2 फेब्रुवारी 2024 रोजी गोळीबार केला होता. त्यानंतर अशाच शस्त्र परवान्यांची चर्चा रंगली होती. तेव्हा एकट्या ठाणे शहरात जवळपास चार हजार शस्त्र परवानाधाकरक असल्याचे ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यानी सांगितले होते. तर, प्रोबेशनरी आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आईकडील शस्त्र परवान्याच्या निमित्ताने पुणे शहरात सहा हजार 300 परवाने जारी करण्यात आल्याचे स्पष्ट झाले होते.

राज्यांचा विचार करता उत्तर प्रदेश आघाडीवर असून तेथे जवळपास 13 लाख शस्त्र परवानाधारक आहेत. त्यानंतर जम्मू काश्मीर (सुमारे 5 लाख), मध्य प्रदेश (सुमारे अडीच लाख), हरियाणा (साधारण दीड लाख), राजस्थान (सुमारे 1 लाख 40 हजार), कर्नाटक (जवळपास एक लाख 17 हजार), हिमाचाल प्रदेश (सुमारे 91 हजार) आणि महाराष्ट्र (जवळपास 88 हजार) यांचा क्रमांक लागतो. यामध्ये उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा, राजस्थान तसेच महाराष्ट्र या राज्यांमध्ये भाजपाची सत्ता आहे, हे उल्लेखनीय. (Arms license : Highest number of arms licenses in BJP-ruled states)

हेही वाचा – Dhananjay Munde : वाल्मिक कराड अन् सुरेश धस यांच्याबाबत धनंजय मुंडेंचा मोठा दावा; म्हणाले, “ते दोघे…”


Edited by Manoj S. Joshi