घरताज्या घडामोडीभारत-चीनचे सैन्य आमने-सामने; भारताचे लष्करप्रमुख लडाखमध्ये दाखल

भारत-चीनचे सैन्य आमने-सामने; भारताचे लष्करप्रमुख लडाखमध्ये दाखल

Subscribe

भारत आणि चीन देशाचे सैन्य आमने-सामने आल्यामुळे या भागातील स्थिती आता नाजूक झाली असून या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी लष्करप्रमुख मनोज नरवणे आज सकाळी लडाखमध्ये दाखल झाले आहेत.

सध्या पूर्व लडाखमधील पँगाँग टीएसओ सरोवर परिसरात प्रचंड तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. भारत आणि चीन देशाचे सैन्य आमने-सामने आहे. त्यामुळे या भागातील नाजूक स्थिती लक्षात घेऊन परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी लष्करप्रमुख मनोज नरवणे आज सकाळी लडाखमध्ये दाखल झाले आहेत.

- Advertisement -

भारतीय सैन्याने डाव उधळला

लडाखमधील पँगाँग सरोवरच्या दक्षिण किनाऱ्यावर सर्वाधिक तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान, २९-३० ऑगस्टला रात्री अचानक पँगाँग सरोवरच्या भागात चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने घुसखोरी करुन एकतर्फी नियंत्रण रेषा बदलण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यानंतरही चीनने घुसखोरीचा प्रयत्न केला. पण, सतर्क असलेल्या भारतीय सैन्याने त्यांचा डाव सातत्याने उधळून लावला.

फिंगर आठपर्यंत मागे फिरावे

गेल्या तीन दिवसांपासून दोन्ही देशांच्या वरिष्ठ सैन्य अधिकाऱ्यांमध्ये सातत्याने चर्चा सुरु आहेत. पण, या सर्व चर्चा आतापर्यंत निष्फळ ठरल्या आहेत. चीन पँगाँग टीएसओ भागातून मागे हटायला तयार नसल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असून चिनी सैन्य फिंगर आठपर्यंत असते. पण, एप्रिलमध्ये ते फिंगर फोरपर्यंत आले आहेत. त्यांनी पूर्वी होते त्याच ठिकाणी फिंगर आठ पर्यंत माघारी फिरावे,अशी भारताची मागणी आहे. दरम्यान, गलवान खोऱ्यातील रक्तरंजित संघर्षानंतर चिनी सैन्य काही भागातून मागे फिरले. पण, पँगाँग टीएसओ परिसर त्यांनी सोडला नव्हता. त्यामुळे या भागात पुन्हा तणावाची स्थिती निर्माण होऊ शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला होता. महत्त्वाचे म्हणजे सध्या तिच परिस्थिती निर्माण झाली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Corona Vaccine खरेदीसह वितरणासाठी तब्बल ७६ देश आले एकत्र!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -