Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश पाकिस्तानी घुसखोरांचा मोठा डाव फसला!

पाकिस्तानी घुसखोरांचा मोठा डाव फसला!

Subscribe

एलओसीमार्फत भारतात घुसखोरी करुन मोठा हल्ल्याचा कट रचनाऱ्या पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन टीमचा (बॅट) प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडला आहे. हल्लेखोर अतिरेक्यांनी घनदाट जंगलातून घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला.

सीमाभागातून घुसखोरी करुन हिंसाचार करणाऱ्या दहशतवाद्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रविवारी अशाच घुसखोरांना कंठस्नान घालण्यात भारतीय लष्कराला मोठे यश आले आहे. भारताच्या नौगाम सेक्टर येथील एका भारतीय पोस्टवर हल्ला करण्याचा बेत या अतिरेक्यांचा होता. दरम्यान, एलओसीमार्फत भारतात घुसखोरी करुन मोठा हल्ल्याचा कट रचनाऱ्या पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन टीमचा (बॅट) प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडला आहे. हल्लेखोर अतिरेक्यांनी घनदाट जंगलातून घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान पाकिस्तानी लष्कराच्या जवानांनी देखील भारतीय जवानांच्या दिशेला अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात भारतीय जवांनानी बॅटच्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.

मोठ्या प्रमाणात दारुगोळा जप्त

- Advertisement -

भारतीय लष्कराने ठार मारलेल्या अतिरेक्यांकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि दारुगोळा आढळला आहे. हा दारुगोळा भारतीय लष्कराने जप्त केला आहे. एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, हल्ला करणाऱ्या घुसखोरांनी लष्करी गणवेश परिधान केला होता. भारतीय लष्कराचा गणवेश परिधान करुन लष्करी तळावर मोठा हल्ला करण्याचा यांचा बेत होता. त्यांच्याजवळ मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे होती. त्यांच्या जवळ पाकिस्तानी चिन्हांचे काही साहित्य देखील आढळले आहे. त्यामुळे हे सर्व घुसखोरी पाकिस्तानी सैनिक होते, असे भारतीय लष्कराने सांगितले आहे. भारतीय लष्कराने बॅटच्या दहशतवाद्यांचा खात्मा करुन त्यांच्याजवळील सर्व दारुगोळा जप्त केला आहे. त्याचबरोबर लष्कराने मृतदेह घेऊन जाण्याची सूचना देखील पाकिस्तानला दिली आहे.


- Advertisement -

हेही वाचा – दहशतवाद्यांचा कुलगाम येथील लष्कराच्या कॅम्पवर हल्ला

- Advertisment -