Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश Ladakh Accident : लडाखमध्ये लष्कराच्या वाहनाला भीषण अपघात; 9 भारतीय जवानांचा मृत्यू

Ladakh Accident : लडाखमध्ये लष्कराच्या वाहनाला भीषण अपघात; 9 भारतीय जवानांचा मृत्यू

Subscribe

नवी दिल्ली : कामानिमित्त एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी स्थलांतरित होत असताना लडाखमध्ये (Ladakh) भारतीय लष्कराचे वाहन (Indian Army vehicle) खोल दरीत कोसळून भीषण अपघात (Terrible Accident) घडल्याची घटना आज (19 ऑगस्ट) रात्री घडली. या अपघातात भारतीय लष्कराच्या 9 जवानांना वीरमरण (9 soldiers of Indian Army martyred) आले आहे. लडाखच्या संरक्षण विभागाकडून या वृत्ताला अधिकृत दुजोरा देण्यात आला असून या घटनेबद्दल सर्वत्र दुःख व्यक्त केले जात आहे. (Army Vehicle Fatal Accident in Ladakh 9 Indian soldiers killed)

हेही वाचा – सोशल मीडिया वापरणाऱ्यांनी परिणामांना सामोरे जाण्याचीही तयारी ठेवावी – सर्वोच्च न्यायालय

- Advertisement -

कारू चौकी येथून जवानांची ही तुकडी लेह येथील क्यारी येथे स्थलांतरित होत होती. यावेळी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा भारतीय जवान प्रवास करत असलेले वाहन खोल दरीत जाऊन कोसळल्याने भीषण अपघात घडला. यात 9 जवानांना वीरमरण आले, तर काही जण गंभीर जखमी झाल्याचे समजत असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, मात्र अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.

लष्कराचे वाहन कियारीकडे जात असताना झाला अपघात

- Advertisement -

अधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, कियारी गावाच्या 7 किलोमीटर आधी लष्कराच्या वाहन खोल दरीत कोसळून अपघात झाला आहे. या दुर्घटनेत आठ जवान आणि एका जेसीओचा मृत्यू झाला आहे. या अपघातात दोन जवान गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. लष्कराची गस्त कारूहून कियारीकडे जात असताना अपघात झाला. तसेच घटनास्थळी बचावकार्य सुरू असल्याचे लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा – छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्यानं कर्नाटकातील बागलकोटमध्ये तणाव; काय आहे कारण?

भारत-चीन सीमेजवळ झाला अपघात

मिळालेल्या माहितीनुसा, आज भारतीय लष्कराच्या तुकडीची तीन वाहने कारूहून कियारीकडे जात होती. या तीन वाहनांपैकी लष्कराच्या ट्रकला अपघात झाला आहे. या तीन वाहनांमध्ये 3 अधिकारी, दोन जेसीओ आणि 34 जवानांचा समावेश होता. तीन वाहनांच्या या पथकात एक जिप्सी, एक ट्रक आणि एक रुग्णवाहिका होती. लडाखच्या दुर्गम भागात अपघात झाला आहे. हे ठिकाण भारत-चीन सीमेवर बांधलेल्या वास्तविक नियंत्रण रेषेतील (LAC) आहेत.

- Advertisment -