Thursday, September 23, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश लष्कराच्या ताफ्यात येणार ४६४ रणगाडे; 'भीष्म'चाही समावेश

लष्कराच्या ताफ्यात येणार ४६४ रणगाडे; ‘भीष्म’चाही समावेश

भारतीय सैन्यदलात लवकरच ४६४ टी-९० भीष्म टॅंक समाविष्ट होणार आहेत. या टॅंकसाठी रशियासोबतभारताने १३,४४८ कोटी रुपयांचा करार केलेला आहे.

Related Story

- Advertisement -

भारतीय सैन्यदलात लवकरच ४६४ टी-९० भीष्म टॅंक समाविष्ट होणार आहेत. या टॅंकसाठी रशियासोबतभारताने १३,४४८ कोटी रुपयांचा करार केलेला आहे. हे सर्व टँक सैन्यदलाला २०२२-२६ च्या दरम्यान मिळणार आहेत. पाकिस्तानच्या सीमेवर हे भीष्म टॅंक तैनात करण्यात येणार आहे. पाकिस्तानही याच प्रकारचे ३६० टँकर खरेदी करण्याचा विचार करत आहे. तर इतर हजार टँक रशियाकडून लायसेन्स घेतल्यानंतर एचवीएफ किटच्या साहय्याने बनवण्यात येणार आहे. यासंबंधी सुरक्षा मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नवीन टी-९० टॅंक अपग्रेड होणार असून त्याचं उत्पादन भारतात बनवण्यात येणार आहे. याच्या अधिग्रहणासाठी एक महिन्याआधी रशियाकडून लायसेन्सची मंजूरी मिळाली असून ४६४ टी-९० टँकच्या उत्पादनासाठी लवकरच ऑर्डिनेंस फॅक्टरी बोर्डच्या अंतर्गत चेन्नई येथील एचवीएफला बनवण्याची परवानगी दिली जाणार आहे.

रात्रीच्या अंधारात लढण्याची क्षमता अधिक

सैन्यदलाकडे सध्याच्या स्थितीमध्ये जवळपास १ हजार ७० टँक आहेत. त्याचसोबत १२४ अर्जुन आणि २४०० जुने टी-२७ टँक उपलब्ध आहेत. २००१ नंतर पहिल्यांदा ६५७ टी-९० टँक रशियाकडून ८ हजार ५२५ कोटी रुपयांना विकत घेण्यात येत आहेत. एका अधिकाऱ्यांनी सांगितले की, उर्वरीत ४६४ टँकबाबत खरेदी करार लवकरच पूर्ण केला जाईल. या नवीन टँकमुळे रात्रीच्या अंधारात लढण्याची क्षमता अधिक वाढणार आहे. ही पूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर साधारण दोन-अडीच वर्षांमध्ये ६४ टँक भारताच्या सैन्यदलात समाविष्ट होतील. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताकडून सुरु असलेली ही खरेदी प्रक्रिया भारताच्या सैन्यदलाला आणखी सुसज्ज करणार आहे. सैन्य दलाचा टी-९० टँक ज्याला भीष्म म्हटले जाते. हा टँक रशियामध्ये बनवण्यात आला आहे. यामध्ये १२५ एमएम बोरची मुख्य गन लावण्यात आली आहे. जी मिसाईल रात्रीच्या वेळीही पाच किलोमीटरपर्यंत फायर करु शकते. या टँकद्वारे दुश्मनांचे टँक आणि हेलिकॉप्टर उद्धवस्त करता येऊ शकतात. प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये टी-९० भीष्म टॅँकचं संचलन दिल्लीमध्ये पहिल्यांदा करण्यात आले होते.

- Advertisement -