घरदेश-विदेशअर्णबचा पाय खोलात, Whats App चॅटमुळे अडचणी वाढल्या

अर्णबचा पाय खोलात, Whats App चॅटमुळे अडचणी वाढल्या

Subscribe

रिपब्लिक टीव्हीचे कार्यकारी संपादक अर्णब गोस्वामी आणि ब्रॉडकास्ट ऑडियन्सचे रिसर्च कौन्सिलचे (बार्क) माजी सीईओ पार्थ दासगुप्ता यांच्यातील Whats App चॅट सोशल मिडियावर व्हायरल झाले आहे. या चॅटमुळे अर्णब आणि टीआरपी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी असलेले दासगुप्ता यांचे लागेबांधे होते हे स्पष्ट होत असून अर्णबचा पाय मात्र खोलात जात असल्याचे बोलले जात आहे. तर टीआरपी घोटाळाप्रकरणासाठी हे चॅट महत्वाचे आहे असे पोलिसांनी म्हटले आहे.

पार्थ हे टीआरपी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी आहेत. त्यांचे अर्णबबरोबरचे हे महत्वाचे चॅट असून त्याचा स्क्रिनशॉट शुक्रवारी व्हायरल झाला आहे. हा ५०० पानांचा दस्तऐवज आहे. या चॅटमध्ये दासगुप्ता बार्कची गोपनीय माहिती सोशल मिडियाच्या माध्यमातून अर्णब यांना देत. तसेच अर्णब याचे पंतप्रधान कार्यालयाबरोबरच केंद्र सरकारच्या सदस्यांबरोबर जवळकीचे संबंध असल्याचे या चॅटमध्ये दिसत आहे. अर्णब टिआरपी मिळवण्यासाठी भाजप सरकारची मदत घ्यायचे असे यात दिसत आहे. या चॅटमध्ये बड्या राजकीय नेत्यांच्या नावाचाही उल्लेख आहे. विशेष म्हणजे या चॅटमध्ये बालाकोटच्या हल्ल्यावरही दोघांमध्ये चर्चा झाली होती. बालाकोट एअर स्ट्राईक होण्याच्या तीन दिवसाआधीच अर्णब यांना त्याची माहिती होती. असे या चॅटमध्ये दिसत आहे. ‘द लॉजिकल इंडियन’ या वेबपोर्टलने या चॅटबद्दल माहिती प्रसिद्ध केली आहे.

- Advertisement -

रिपब्लिक व अतर काही वाहिन्या टीआरपीमध्ये फेरफार करत असल्याचे समोर आले होते. त्यानंतर गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात बार्कने याबद्दल हंसा ग्रुपच्या माद्यमातून तक्रार दाखल केली होती.


हेही वाचा – राज्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लसीकरणाचा शुभारंभ; पहिल्या दिवशी २८,५०० कोरोनायोद्ध्यांना लस

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -