घरदेश-विदेशअर्णब गोस्वामीची रवानगी तळोजे कारागृहात

अर्णब गोस्वामीची रवानगी तळोजे कारागृहात

Subscribe

वास्तु रचनाकार अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात गोस्वामीसह फिरोज शेख आणि नितेश सारडा यांना अटक

सुरक्षेच्या कारणास्तव रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि अन्य दोघांना येथून रविवारी सकाळी ९ वाजता तळोजे येथील कारागृहात हलविण्यात आले आहे. वास्तु रचनाकार अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी गोस्वामीसह स्काय मीडियाचे फिरोज शेख आणि स्मार्ट वर्क्स कंपनीचे नितेश सारडा यांना अटक केली असून, ते १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

4 मे 2018 रोजी नाईक आणि त्यांच्या आईने आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोट या तिघांचा उल्लेख असल्याने पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. हे प्रकरण पुढे न सरकल्याने विद्यमान गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याची चौकशी करण्याचे आदेश गुन्हे अन्वेषण विभागाला दिल्यानंतर रायगड आणि मुंबई पोलिसांनी गोस्वामी यांना ४ नोव्हेंबर रोजी त्यांच्या वरळी येथील निवासस्थानातून ताब्यात घेऊन अटक केली. तसेच शेख आणि सारडा यांनाही अटक करण्यात आली. या तिघांना येथील सत्र न्यायालयाने १८ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

- Advertisement -

त्यानंतर तिघांना शहरातील एका मराठी शाळेत कैद्यांसाठी तयार करण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये ठेवण्यात आले. दरम्यान, गोस्वामी यांच्या जामीन याचिकेवर युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर शनिवारी मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय राखून ठेवला. तर न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि एस. एम. कर्णिक यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला अन्वय नाईक यांच्या मृत्यू संदर्भात क्लोजर रिपोर्ट देणार्‍या आणि तपास करणार्‍या अधिकार्‍यांच्या संदर्भात नोटीस बजावली. यावर राज्य सरकार न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करेल. गोस्वामी यांच्या न्यायालयीन कोठडीवर पोलिसांनी केलेल्या पुनर्विचार याचिकेवरील सुनावणी आता 9 नोव्हेंबर रोजी होणार आहे.

अर्णब गोस्वामी, फारुख शेख आणि नितेश सरडा या तिघांना रविवारी सकाळी येथून तळोजे कारागृहात हलविण्यात आले. सुरक्षेच्या दृष्टीने आणि हाय प्रोफाइल केस असल्याने जिल्हा कारागृह अधीक्षकांनी या तिघांना तळोजे येथे हलविण्याची मागणी वरिष्ठांकडे केली होती. त्यानुसार तुरुंग महानिरीक्षकांच्या आदेशानुसार तिघांनाही तळोजे कारागृहात हलविले आहे.
-ए. टी. पाटील, अधीक्षक, जिल्हा कारागृह, अलिबाग

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -