Thursday, March 27, 2025
27 C
Mumbai
Homeदेश-विदेशAvalanche Badrinath Dham : ग्लेशियर तुटल्याने अपघात; 57 कामगार दबले तर 16 जणांना वाचविण्यात यश

Avalanche Badrinath Dham : ग्लेशियर तुटल्याने अपघात; 57 कामगार दबले तर 16 जणांना वाचविण्यात यश

Subscribe

उत्तराखंडमधील चमोली येथे गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या बर्फवृष्टी आणि पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशातच आज बद्रीनाथ धामजवळील माना गावाजवळ ग्लेशियर तुटल्याने जवळपास 57 कामगार बर्फाच्या मोठ्या तुकड्यांखाली दबले गेले आहेत.

नवी दिल्ली : उत्तराखंडमधील चमोली येथे गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या बर्फवृष्टी आणि पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशातच आज (28 फेब्रुवारी) बद्रीनाथ धामजवळील माना गावाजवळ ग्लेशियर तुटल्याने जवळपास 57 कामगार बर्फाच्या मोठ्या तुकड्यांखाली दबले गेले आहेत. बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन (BRO) च्या कंत्राटदाराखाली सर्व कामगार काम करत होते. यापैकी 16 जणांना वाचवण्यात यश आले आहे, तर सुमारे 40 जण अजूनही अडकून पडले आहेत. आयटीबीपी, बीआरओ आणि इतर बचाव पथके ग्लेशियरच्या तुकड्याखाली अडकून पडलेल्या कामगारांना वाचविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. (Around 57 workers were buried under large chunks of ice after a glacier broke near Mana village near Badrinath Dham)

मिळालेल्या माहितीनुसार, बद्रीनाथच्या माना गावाच्या सीमावर्ती भागात बीआरओ कामगार रस्ता बांधण्याचे काम करत आहेत. मात्र आज दुपारी बद्रीनाथ धामच्या समोर असलेल्या माना येथे अचानक ग्लेशियर तुटले आणि कामगार त्याखाली दबले गेले आहेत. ग्लेशियर तुटण्याच्या घटनेनंतर बर्फवृष्टी आणि पावसामुळे बचाव कार्यात अडथळा येत आहे. बीआरओचे कार्यकारी अभियंता सीआर मीना म्हणाले की, कामगारांना वाचविण्यासाठी बचाव कार्य सुरू आहे. परंतु जोरदार बर्फवृष्टीमुळे बचाव पथकाला अडचणी येत आहेत. तीन ते चार रुग्णवाहिकाही पाठवण्यात आल्या आहेत, परंतु त्यांनाही घटनास्थळी पोहचण्यात अडचणी येत आहेत.

हेही वाचा – Manav Sharma Suicide : …अन्यथा पुरुष असेच आत्महत्या करतील, आग्र्यात पुन्हा अतुल सुभाष सारखी घटना

चमोलीचे जिल्हा दंडाधिकारी संदीप तिवारी म्हणाले की, ग्लेशियर तुटण्याची माहिती मिळाली असून तिथे बीआरओचे 57 कामगार तिथे काम करत होते. यातील 16 जणांना वाचवण्यात यश आले आहे. तसेच इतर कामगारांना वाचविण्यासाठी आयटीबीपी, एसडीआरएफ आणि प्रशासनाच्या तुकड्या घटनास्थळी तैनात आहेत. जोरदार बर्फवृष्टीमुळे कामगारांच्या मदतीसाठी हेलिकॉप्टरची सेवा देणे शक्य नाही. तसेच सॅटेलाइट फोन आणि इतर उपकरणे कामगारांकडे नसल्याने त्यांच्याशी संपर्क साधता येत नाही. परंतु सध्या कोणत्याही जीवितहानीबद्दल अधिकृत माहिती मिळालेली नाही. परंतु जखमींना सध्या माना गावातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर गंभीर जखमी कामगारांना माना जवळील लष्करी छावणीत पाठवण्यात आले आहे.

मुख्यमंत्री धामी अधिकाऱ्यांच्या संपर्कात

ग्लेशियर तुटण्याच्या घटनेनंतर उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. त्यांनी माहिती दिली की, 16 कामगारांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. तसेच इतर कामगारांना वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आपत्ती व्यवस्थापन विभाग पूर्णपणे सक्रिय असून जिल्हा प्रशासन आणि मी स्वतः सतत संपर्कात आहे. शक्य तितक्या लवकर सर्वांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचा आमचा प्रयत्न आहे, अशी माहिती पुष्कर धामी यांनी दिली.

हेही वाचा – EPF : मोठी बातमी! सीबीटीने भविष्य निर्वाह निधीच्या व्याजदराबाबत घेतला निर्णय