नवी दिल्ली : हिंडनबर्ग प्रकरण असो किंवा काँग्रेसचे आरोप असो यामुळे सतत चर्चेत असणारे प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी आता पुन्हा एकदा फसले आहेत. अदानी यांच्यावर अमेरिकन गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या मुद्द्यावरून कॉंग्रेस नेता आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांनी गुरुवारी एक पत्रकार परिषद घेतली. गौतम अदानींना अटक करण्याची मागणी करण्यासोबतच हा मुद्दा आपण संसदेतही चर्चेला घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. (arrest gautam adani he does 2000 crore scam attacks rahul gandhi)
अमेरिकेच्या सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनने गौतम अदानी यांच्यासह त्यांच्या काही सहकाऱ्यांवर हे आरोप केले आहेत. तसेच, सौर ऊर्जा प्रकल्पासंदर्भात अदानींनी भारतीय अधिकाऱ्यांना 250 दशलक्ष डॉलरची लाच दिल्याचा आरोप अमेरिकेच्या सरकारी संस्थेकडून करण्यात आला आहे. ज्यामुळे आता अदानी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी म्हणाले की, यावेळी आम्ही आरोप केलेले नाहीत, तर थेट अमेरिकेकडून हे आरोप झालेले आहेत. अदानींना अटक होणार नाही, याची आपल्याला खात्री असल्याचे सांगतानाच अदानी आणि मोदी एकत्र असतील तर नक्कीच सेफ असतील, अशी टीका देखील त्यांनी केली. त्यांची काम करण्याची पद्धत मला आवडत नाही. अदानी यांच्यावर अमेरिका, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश आणि केनियासह अनेक देशांमध्ये अशाच पद्धतीने काम केल्याचा आरोप आहे.
हेही वाचा – Gautam Adani : अदानी पुन्हा फसले, अमेरिकेने भ्रष्टाचार आणि लाचखोरीसारखे गंभीर आरोप लावले
यासोबतच राहुल गांधी यांनी सेबीच्या अध्यक्षा माधवी बूच यांची देखील चौकशी करण्याची मागणी केली आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेता म्हणून जनतेला जागरूक करणे, ही माझी जबाबदारी असल्याचे ते म्हणाले. गुंतवणूकदारांना वाचवायचे असेल तर त्यासाठी सेबी अध्यक्षांची देखील चौकशी करणे गरजेचे आहे. तसेच त्यांना पदावरून हटवण्याची मागणी देखील त्यांनी केली.
या पत्रकार परिषदेतही राहुल गांधी यांनी अदानींवर अनेक आरोप केले. अदानी यांना श्रीमंत करण्यासाठी देशातील वीज अजून महाग केली जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. अदानी यांनी दोन हजार कोटींचा घोटाळा केला असून अमेरिका तसेच भारतातील गुंतवणूकदारांशी ते खोटं बोलले आहेत.
मैं कहना चाहता हूं कि: जहां भी करप्शन है, वहां जांच होनी चाहिए।
मगर जांच अडानी से शुरू होनी चाहिए। अडानी को अरेस्ट कीजिए, पूछताछ कीजिए और फिर जो भी इस भ्रष्टाचार में शामिल है, उसे पकड़िए।
मैं आपको बता रहा हूं कि इस जांच के आखिर में नरेंद्र मोदी का नाम आएगा और नरेंद्र मोदी के… pic.twitter.com/Q7iKbf601j
— Congress (@INCIndia) November 21, 2024
अमेरिकन तपास यंत्रणा एफबीआयच्या मते अदानी यांनी अमेरिका तसेच भारतात गुन्हे केले आहेत. यानंतरही सीबीआय आणि ईडी काहीच कारवाई का करत नसल्याची विचारणा राहुल गांधी यांनी केली. अदानी यांना अटक होणार नाही, हे आम्हाला माहीत आहे. पण जनतेला काय ते खरं सांगणे, हे आमचं काम आहे, असेही ते पुढे म्हणाले.
Edited by : Ashwini A. Bhatavdekar