घरताज्या घडामोडीपीपीई सूटवर डॉक्टरांनी लावले स्वत:चे फोटो; कारण वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

पीपीई सूटवर डॉक्टरांनी लावले स्वत:चे फोटो; कारण वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

Subscribe

कोरोना रुग्णांची सेवा करताना स्वत:चा कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी डॉक्टर पीपीई सूट घालतात. मात्र, आता याच पीपीआ सूटवर काही डॉक्टरांनी स्वत:चे फोटो लावले आहेत.

कोरोना विषाणूने जगात अक्षरश: कहर केला आहे. दिवसेंदिवस कोरोना विषाणूंच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. दरम्यान, या कोरोनाची लागण झालेल्यांवर उपचार करण्याकरता डॉक्टर्स, नर्स अहोरात्र मेहनत घेत आहेत. मात्र, कोरोना रुग्णांची सेवा करताना स्वत:चा कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी डॉक्टर पीपीई सूट घालतात. मात्र, आता याच पीपीआ सूटवर काही डॉक्टरांनी स्वत:चे फोटो लावले आहेत. सध्या हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहेत.

- Advertisement -

‘या’मागचे कारण तरी वाचा

पीपीई सूटवर डॉक्टरांनी स्वत:चे फोटो लावण्याचे कारण दिले आहे. ते म्हणतात की, या मागील कारण आहे ते कोरोना रुग्ण. एखादी व्यक्ती रोज रुगणांसमोर येते आणि त्यांच्यासाठी काहीतरी करते. मात्र, त्या व्यक्तीचा चेहरा तुम्हाला दिसत नाही, असे दररोज झाल्यास तुमच्या मनाची परिस्थिती काय होईल, अशीच परिस्थिती आहे ती कोरोना रुग्णांची. दररोज डॉक्टर्स पीपीई सूट घालून रुग्णालयात येतात. रुग्णांवर उपचार करतात आणि तपासणी करुन निघून जातात. मात्र, या पीपीई सूटमागे आपली सेवा करणारा डॉक्टर नेमका आहे तरी कोण? तो कसा दिसतो? हे देखील रुग्णाला समजत नाही. याचा त्या रुग्णाच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. रुग्णावर शारीरिक उपचार जितके महत्त्वाचे आहेत, तितकेच त्याचे मानसिक आरोग्यही जपणे गरजेचे आहे. रुग्ण मानसिकरित्या जितका मजबूत तितकीच त्याच्यामध्ये सुधारणा लवकर होते. हेच लक्षात घेत अरुणाचल प्रदेशच्या डॉक्टरांनी आपल्या पीपीई सूटवर आपले स्वत:चे फोटो लावलेत. चांगलांगचे जिल्हाधिकारी देवांश यादव यांनी आपल्या ट्विटवर फोटो शेअर केला आहे.

इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना यादव यांनी सांगितलं की, ‘माझ्या काही मित्रांकडून ऐकले की न्यूयॉर्कमधील डॉक्टरांनी पीपीई सूटवर आपले फोटो लावायला सुरुवात केली. रुग्ण आपल्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचा चेहरा कित्येक आठवडे, कित्येक महिने पाहू शकले नाही. मानवी चेहरा न पाहताच काही रुग्णांचा मृत्यू झाला. कोरोना रुग्णाची सेवा करण्यात कोरोना योद्धा डॉक्टर कोणतीच कसर सोडत नाही आहेत. आपल्याने जे जे शक्य होईल ते करण्याचा ते प्रयत्न करत आहे. अरुणाचल प्रदेशमधील डॉक्टरांनीही घेतलेल्या या निर्णयाचे सर्वांनी कौतुक केले आहे’.

- Advertisement -

हेही वाचा – नाशिकमध्ये दिवसभरात ८१ नवे पॉझिटिव्ह; ८ बाधितांचा मृत्यू


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -