अरुणाचल प्रदेश: भारत – चीन सीमेवरील बेपत्ता झालेल्या १९ मजुरांचा शोध सुरु

बेपत्ता झालेल्या १९ कामगारांचा शोध मागील १३ दिवसांपासून सुरु आहे. अरुणाचल प्रदेश राज्यातील सुदूर सुरुंग कुमे या जिल्यात हे मजूर रस्ता बनविण्याचे काम करत होते.

अरुणाचल प्रदेश(arunachal pradesh) मधील भारत – चीन सीमेजवळ(india-china border )काम करत असलेले १९ कामगार बेपत्ता झाल्याचीघटना घडली आहे. त्या बेपत्ता झालेल्या १९ कामगारांचा शोध मागील १३ दिवसांपासून सुरु आहे. अरुणाचल प्रदेश राज्यातील सुदूर सुरुंग कुमे या जिल्यात हे मजूर रस्ता बनविण्याचे काम करत होते. याच दरम्यान आणखी एक माहिती समोर आली ती म्हणजे, कुमेई नदीमध्ये बेपत्ता झालेल्या मजूरांपैकी एका मजुराचा मृतदेह सापडला अशी शक्यता सुद्धा वळविण्यात येत आहे. मात्र या सापडलेल्या मृतदेहाची अजूनही ओळख पटलेली नाही तीच ओळख पटविण्यासाठी अधिकाऱ्यांचे पथक घटनास्थळी पाठविण्यात आले आहे;.

हे ही वाचा –  गांधी स्मृतीच्या विशेष पत्रिकेत सावरकरांचं कौतुक, त्यावरून तुषार गांधींची टीका

चीनच्या सीमेलतच बेपत्ता झालेले मजूर रास्ता बांधकाम करत होते. या सगळ्या कामगारांनी ईदच्या निमित्ताने त्यांच्या ठेकेदारांकडे सुट्टी सुद्धा मागितली होती. पण ठेकेदाराकडून कामगारांची सुट्टी मंजूर झाली नाही आणि त्यामुळेच कामगार रास्ता निर्मितीचे काम अर्धवट सोडून निघून गेले होते आणि तेव्हा पासूनच ते सर्व कामगार बेपत्ता झाले असे सांगण्यात येत आहे. हे दर्व मजूर मूळचे आसामचे आहेत. बीआरओने या सर्व मजुरांना आसाम मधून कंत्राटी तत्वावर रस्ते बांधणीच्या कामासाठी आणले होते आणि ईद साजरी करण्यासाठी या सर्व मजुरांना पुम्हा त्यांच्या घरी आसामला जायचे होते आणि त्या साठी हे सर्व मजूर वारंवार सुट्टीची मागणी सुद्धा करत होते. पण त्यांना सुट्टी देण्यात आली नाही.

हे ही वाचा – हरियाणात खाण माफियांनी डीएसपीला वाहनाखाली चिरडून मारले

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून अरुणाचल प्रदेश मध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली  आहे. कदाचित हे कामगार त्यांच्या घरी जाताना नदीत बुडाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पण असं असलं तरीही या मजूरांसोबत नेमकं काय घडलं हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण बेपत्ता मजुरांचा शोध सुरूच आहे असं सांगण्यात येत आहे.

हे ही वाचा – शिंदे गटातील खासदारांनी घेतली लोकसभा अध्यक्षांची भेट, स्वतंत्र गट स्थापन करण्याबाबत भेटीत…