घरदेश-विदेशArvind Kejriwal Arrest: अरविंद केजरीवालांच्या मदतीला धावले राहुल गांधी; कायदेशीर मदत पुरवणार

Arvind Kejriwal Arrest: अरविंद केजरीवालांच्या मदतीला धावले राहुल गांधी; कायदेशीर मदत पुरवणार

Subscribe

नवी दिल्ली: ईडी म्हणजे सक्तवसुली संचालनालयाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अबकारी धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात गुरुवारी रात्री अटक केली. केजरीवाल यांच्या अटकेवर विरोधकांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. ईडीच्या अटकेनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अरविंद केजरीवाल यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधल्याचे सांगितले जात आहे. (Arvind Kejriwal Arrest Rahul Gandhi came to the aid of Arvind Kejriwal Will provide legal assistance)

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी यांनी केजरीवाल यांच्या कुटुंबीयांना पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी उद्या केजरीवाल किंवा त्यांच्या कुटुंबीयांना भेटून पुढील कायदेशीर मदत देण्याचा प्रयत्न करतील. अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर काँग्रेसने केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आणि दावा केला की, “भयभीत हुकूमशहा, यांना मृत लोकशाही हवी आहे.”

- Advertisement -

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ‘एक्स’वर पोस्ट केली, ‘भयभीत हुकूमशहा, मृत लोकशाही निर्माण करू इच्छितो. त्यांनी दावा केला, “माध्यमांसह सर्व संस्था ताब्यात घेणे, पक्ष फोडणे, कंपन्यांकडून पैसे उकळणे, प्रमुख विरोधी पक्षाचे खाते गोठवणे ही ‘शैतानी शक्ती’ कमी होती की काय, आता निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांना अटकदेखील केली जात आहे. इंडिया आघाडी याला चोख प्रत्युत्तर देईल, असंही राहुल गांधी म्हणाले.

ईडीने गुरुवारी रात्री दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली आणि त्यांच्या कार्यालयात नेले. दिल्ली उच्च न्यायालयाने आम आदमी पक्षाच्या (आप) राष्ट्रीय समन्वयकाला एजन्सीच्या कोणत्याही सक्तीच्या कारवाईपासून दिलासा देण्यास नकार दिल्यानंतर, काही तासांतच त्यांची अटक झाली. मुख्यमंत्री पदावर असताना अटक होण्याची ही पहिलीच घटना आहे.

- Advertisement -

केजरीवालांना अटक का?

दिल्ली सरकारच्या उत्पादन शुल्क धोरण 2021-22 मधील कथित घोटाळ्यात ईडी मनी लाँड्रिंगचा तपास करत आहे. याला दारू घोटाळा असेही म्हणतात.

जुलै 2022 मध्ये दिल्लीच्या तत्कालीन मुख्य सचिवांनी एलजी व्हीके सक्सेना यांना अहवाल सादर केला होता. यामध्ये अबकारी धोरणात अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणी आधी सीबीआयने आणि नंतर ईडीने गुन्हा दाखल केला.

दिल्लीचे तत्कालीन उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना गेल्या वर्षी 26 फेब्रुवारीला या दारू घोटाळ्यात अटक करण्यात आली होती. त्यानंतर 4 ऑक्टोबरला आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनाही ईडीने अटक केली होती.

गेल्या वर्षीच 2 नोव्हेंबरला ईडीने केजरीवाल यांना पहिले समन्स पाठवले होते. तेव्हापासून 21 मार्चपर्यंत ईडीने 10 समन्स बजावले आहेत, मात्र केजरीवाल हजर झाले नाहीत.

गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयाने केजरीवाल यांच्या अटकेला स्थगिती देण्याची याचिका फेटाळून लावली होती. गुरुवारी संध्याकाळी 7 वाजता ईडीचे पथक मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले आणि दोन तासांच्या चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली.

(हेही वाचा: Supriya Sule : आमदार रोहित पवारांसह युगेंद्र पवारांना संरक्षण द्या, सुप्रिया सुळेंचे पुणे पोलिसांना पत्र)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -