घरताज्या घडामोडीकेजरीवालांकडून गडकरींच्या नावे आमदारांना फोन, योगेंद्र यादवांचा मोठा खुलासा

केजरीवालांकडून गडकरींच्या नावे आमदारांना फोन, योगेंद्र यादवांचा मोठा खुलासा

Subscribe

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे सीबीआयच्या रडारवर आहेत. आपचे माजी नेते योगेंद्र यादव यांनी दिल्लीतील मद्य धोरणावर भाष्य केलं आहे. परमजीत कात्याल यांच्या एका जुन्या व्हिडीओवर प्रतिक्रिया देत त्यांनी माहिती दिली आहे. अरविंद केजरीवाल यांनी नितीन गडकरी यांच्या नावे आपल्या आमदारांना फोन केल्याचा मोठा खुलासा योगेंद्र यादव यांनी केला आहे.

- Advertisement -

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आदेशानुसार डिसेंबर २०१३ मध्ये त्यांच्याच आमदाराला भाजपच्या नावाने फोन करण्यात आले. अशा कृत्यांमुळे आमचा आप नेतृत्वावर भ्रमनिरास झाला होता. मद्य धोरणावरून आप आणि भाजप यांच्यात सुरू असलेल्या वादाच्या दरम्यान, भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी काल मंगळवारी रात्री ट्विटरवर एक नवीन व्हिडीओ शेअर केला होता. त्यावर सुद्दा त्यांनी दिल्लीतील सत्ताधारी पक्षावर टीका केली आहे.

अमित मालवीय यांनी अरविंद केजरीवाल यांच्याकडून चौकशीचे आदेश दिल्यानंतर नवीन मद्य उत्पादन शुल्क धोरण का मागे घेण्यात आले?, याचे स्पष्टीकरणही मागितले आहे. मालवीय यांनी जुना व्हिडिओ शेअर केला आहे. जो आपचे माजी सचिव परमजीत कात्याला यांचा आहे. या व्हिडीओमध्ये ते केजरीवाल यांची खिल्ली उडवताना दिसत आहेत. यामध्ये भाजपकडून आपचे ३५ आमदार विकत घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.

- Advertisement -


हेही वाचा : मुंद्रा पोर्ट ड्रग्ज प्रकरणात NIAची मोठी कारवाई; २९८८ किलो हेरॉइन जप्त


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -