घरदेश-विदेशदारू घोटाळा म्हणजे काय हे मला आजपर्यंत समजले नाही, अरविंद केजरीवालांचा भाजपला...

दारू घोटाळा म्हणजे काय हे मला आजपर्यंत समजले नाही, अरविंद केजरीवालांचा भाजपला टोला

Subscribe

नवी दिल्ली – ईडीने दिल्लीतील दारू धोरण प्रकरणी 40 ठिकाणी छापे टाकले. यावर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी टीका केली. यावेळी हा दारू घोटाळा काय आहे हे मला आजपर्यंत समजले नाही, असे म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावला.

दिल्लीतील दारू धोरण प्रकरणी ईडी आज देशभरात 40 ठिकाणी छापे टाकत आहे. यावर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, हा दारू घोटाळा काय आहे हे मला आजपर्यंत समजले नाही. आधी सांगू लागले की दीड लाख कोटींचा घोटाळा झाला आहे. दिल्लीचे एकूण बजेट फक्त 70 हजार कोटी आहे, मग दीड लाख कोटींचा घोटाळा कसा झाला. आणखी एका नेत्याने सांगितले की, आठ हजार कोटींचा घोटाळा आहे. तिसरा नेता म्हणाला की 1100 कोटींचा घोटाळा आहे. एलजी साहेब म्हणाले 144 कोटींचा घोटाळा आहे. सीबीआयने आपल्या एफआयआरमध्ये लिहिले आहे की, एक कोटींचा घोटाळा झाला आहे आणि शेवटी, मनीषजींनी त्या ठिकाणी छापा टाकला तेव्हा एक पैसाही सापडला नाही, त्यांच्या लॉकरमध्ये काहीही सापडले नाही, गावातून आले, तिथे काहीही सापडले नाही. मनीषने जमीन घेतली नाही का, असे ग्रामस्थांना विचारले असता ते म्हणाले- नाही.

- Advertisement -

केजरीवाल पुढे म्हणाले  केंद्र सरकारने सीबीआय ईडीला सकाळपासून संध्याकाळपर्यंत सोडावे आणि देशासाठी काही सकारात्मक काम करावे. देशासाठी काही सकारात्मक काम केले नाही तर देशाची प्रगती कशी होणार. 24 तास सर्वांवर फक्त CBI, ED लादली जात आहे, संपूर्ण देशाला घाबरवले जात आहे, धमकावले जात आहे, अशाने देशाची प्रगती कशी होणार. चुकीचे काम करणाऱ्याला पकडा, पण प्रत्येकावर सीबीआय, ईडी लादून देश पुढे जाणार नाही. तुम्ही आमची पत्रकार परिषद पहा, आमची ९५ टक्के पत्रकार परिषद सकारात्मक गोष्टींवर असते. आत्ता मी निघत आहे, आमच्या ११०० मुलांनी NEET JEE चे पेपर पास केले आहेत, ही मोठी गोष्ट आहे की सरकारी शाळांतील मुलांनी अभियांत्रिकी आणि वैद्यकीय पेपर पास केले आहेत. असे चांगले काम करा, सकारात्मक काम करा, असे मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -