घरताज्या घडामोडीMission Punjab : केजरीवाल यांचा डिनर विथ ऑटो ड्रायव्हर, अन् राईडही

Mission Punjab : केजरीवाल यांचा डिनर विथ ऑटो ड्रायव्हर, अन् राईडही

Subscribe

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे पंजाब दौऱ्यावर आहेत. सोमवारी त्यांनी मोगा येथे एका रॅलीला संबोधित केले. या रॅलीदरम्यान त्यांनी महिलांच्या अनुषंगाने मोठी घोषणाही केली. आम आदमी पार्टीचे सरकार पंजाबमध्ये आल्यास, १८ वर्षांहून अधिक वयोगटाच्या महिलांना १ हजार रूपये देण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. निवडणुकीच्या या जुमल्यापेक्षा अरविंद केजरीवाल यांची आणखी एक गोष्ट खूपच चर्चेत आहे. ती म्हणजे एका ऑटो रिक्षा चालकाच्या घरी जाऊन जेवणाचा घेतलेला आस्वाद. स्वतः केजरीवाल यांनीच ही माहिती ट्विटच्या माध्यमातून जाहीर केली आहे. एका ऑटो रिक्षा चालकाच्या विनंतीवरून केजरीवाल यांनी तडकाफडकी निर्णय घेतला, अन् जेवणानंतर एक ऑटोरिक्षा राईडचाही अनुभव मुख्यमंत्र्यांनी यावेळी घेतला.

काय आहे केजरीवाल यांचे ट्विट

केजरीवाल यांनी ट्विट केले की, दिलीप तिवारी यांनी आज अतिशय मनापासून आपल्या घरी बोलावले. त्यांच्या घरच्यांनी खूपच प्रेम दिले. अतिशय रूचकर असे जेवण खायला दिले. मी संपूर्ण परिवाराला दिल्लीत आपल्या घरी जेवणाचे आमंत्रण दिले आहे.

- Advertisement -

अरविंद केजरीवाल हे दोन दिवसाच्या पंजाब दौऱ्यावर आहेत. पंजाबमध्ये बोलताना त्यांनी महिलांसाठी विशेष अशा पॅकेजची घोषणा केली आहे. आपचे सरकार आल्यास प्रत्येक महिलेला एक हजार रूपये देणार असल्याचे ते म्हणाले. ज्या महिला १८ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या आहेत, अशा महिलांना हा लाभ मिळेल. ही रक्कम पेन्शनच्या रकमेपेक्षा वेगळी असेल असेही केजरीवाल यावेळी म्हणाले.

- Advertisement -

पंजाबमध्ये नकली केजरीवाल

पंजाबमध्ये सध्या नकली केजरीवाल फिरत असल्याचे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. मी जे आश्वासन देतोय तेच आश्वासन नकली केजरीवालही देत आहे. दोन दिवसांनंतर नकली केजरीवालही तेच बोलत आहे, पण करत काहीच नाही. याआधी २४ तास ३०० युनिट वीज मोफत देण्याचे आश्वासन केजरीवाल यांनी दिले आहे. त्यासोबतच पंजाबमध्ये प्रत्येक व्यक्तीला मोफत वैद्यकीय उपचार देण्याचीही घोषणा केजरीवाल यांच्या आप पक्षाकडून करण्यात आली आहे.

पंजाबमध्ये १५ हजार मोहल्ला क्लिनिक स्थापन करण्याच्या आश्वासनानंतर नकली केजरीवालनेही ही घोषणा केली. सोमवारी लुधियाना येथे ऑटो रिक्षा चालकांसोबत भेटायला जाणार असल्याची मी घोषणा केली होती, हा कार्यक्रम कळताच नकली केजरीवालही याठिकाणी पोहचला. त्या ऑटोरिक्षा चालकांच्या कार्यालयात नकली केजरीवालही पोहचला. माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांचा उल्लेख करत केजरीवाल यांनी सांगितले की चन्नी यांच्या आधीच्या मुख्यमंत्र्यांनी रोजगार, स्मार्टफोन आणि कर्जमाफीचे आश्वासन दिले होते.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -