घरदेश-विदेशArvind Kejriwal : सर्व घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून, केजरीवाल अटकेसंदर्भात अमेरिकेची टिप्पणी

Arvind Kejriwal : सर्व घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून, केजरीवाल अटकेसंदर्भात अमेरिकेची टिप्पणी

Subscribe

नवी दिल्ली : कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सक्तवसुली संचालनालयाने (ED) 21 मार्च रोजी अटक केली. ते आता 28 मार्चपर्यंत ईडी कोठडीत आहेत. अमेरिकेने याबाबतही भाष्य केले आहे. केजरीवाल यांच्या अटकेसंदर्भातील घडामोडींवर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत, असे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.

हेही वाचा – Kolhapur Politics:…तर हातकणंगलेत उमेदवार देणार; जयंत पाटलांच्या वक्तव्याने मविआची स्ट्रॅटेजी समोर

- Advertisement -

अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाचे भारताच्या अंतर्गत बाबींवर प्रतिक्रिया देण्याचे सुरूच आहे. नुकतेच सीएएवर भाष्य केल्यानंतर आता अरविंद केजरीवाल यांच्या अटकेबाबत अमेरिकेने प्रतिक्रिया दिली आहे. यासंदर्भात निष्पक्ष, निर्धारित काळात तसेच पारदर्शक कायदेशीर प्रक्रिया व्हावी, असे आम्हाला अपेक्षित असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. या प्रकरणापूर्वी सीएएसंदर्भात अमेरिकेने भाष्य केले होते. आम्ही सीएएवर बारीक लक्ष ठेवून आहोत, असे या प्रवक्त्याने त्यावेळी म्हटले होते. भारतात लवकरच लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. यापार्श्वभूमीवर प्रत्येक मुद्द्यावर अमेरिका घेत असलेली भूमिका देशाच्या ध्येयधोरणासाठी योग्य नसल्याचे मानले जात आहे.

हेही वाचा – Vijaypat Singhania : इच्छा नसतानाही…; विजयपत सिंघानियांनी गौतमसोबतच्या भेटीबाबत केला खुलासा

- Advertisement -

अरविंद केजरीवाल यांच्या अटकेसंदर्भात अमेरिकेच्या आधी जर्मनीनेही टिप्पणी केली होती. मात्र, भारताकडून त्याला चोख प्रत्युत्तर देण्यात आले. भारताने जर्मन दूतावासाच्या उपप्रमुखांना पाचारण करून खडे बोल सुनावले होते.

इंडियाची रविवारी महारॅली

अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ विरोधकांची आघाडी असलेल्या इंडियातर्फे दिल्लीत महारॅली काढण्यात येणार आहे. राजधानीतील रामलीला मैदानावर 31 मार्च रोजी ही रॅली काढण्यात येणार आहे. देशात केंद्रीय यंत्रणांचा वापर करून, आमदार खरेदी करून, विरोधकांना विकत घेऊन, खोटे खटले करून आणि अटक करून संपूर्ण विरोधी पक्षाला एक-एक करून संपवण्याचे कारस्थान सुरू आहे. पश्चिम बंगालपासून ते बिहारपर्यंत इंडियाच्या नेत्यांना खोटे गुन्हे दाखल करून गप्प करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप विरोधकांनी केला आहे.

हेही वाचा – Chandrapur : आशीर्वाद द्यायला फडणवीस आले, आता विजय निश्चित – सुधीर मुनगंटीवार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -