घरदेश-विदेशअरविंद केजरीवालांचं पाकिस्तानला आव्हान, काश्मीर प्रश्नासंबंधित घेणार गृहमंत्र्यांची भेट

अरविंद केजरीवालांचं पाकिस्तानला आव्हान, काश्मीर प्रश्नासंबंधित घेणार गृहमंत्र्यांची भेट

Subscribe

काश्मीर मध्ये अल्पसंख्याक गटाला दहशतवादी संघटनेतर्फे टार्गेट किलिंगचा शिकार व्हावं लागत आहे. अनेक हिंदू लोकांचा , काश्मीर पंडीतांचा मृत्यू यावेळी झाल. दरम्यान संपूर्ण देशभरात याचे तीव्र पडसाद उमटत आहेत तसेच मोठ्या प्रमाणात याला विरोध देखील होतोय. दिल्लीत अरविंद केजरीवाल सरकारने अल्पसंख्याक गट टार्गेट होत असल्याने याच्या निषेधार्थ ‘जन आक्रोश’ रॅली काढत केंद्र सरकारला लक्ष्य केलं आहे.

जन आक्रोश मोर्चाचं आयोजन

दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीमध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले, गेल्या काही दिवसात काश्मीरमध्ये एकूण 18 लोकांना आपला जीव गमवावा लागला. यासह काश्मीरमध्ये ज्या लोकांना  पोलिसांनी सुरक्षा पुरवली होती त्यांची देखील हत्या करण्यात आली. एकीकडे काश्मीर जळतंय तर दुसरीकडे भाजप राजकारण करण्यात   व्यस्त आहे. काश्मीरमध्ये भाजप पूर्णपणे अपयशी ठरलीये

- Advertisement -

काश्मीरमध्ये होणाऱ्या हिंसाचारावर ‘आप’ने भाष्य केलंय. काश्मिरी पंडितांना सुरक्षा देण्यात यावी त्यांचा आवाज  सरकारपर्यंत पोहोचावा अशी मागणी आपने केलीये. दरम्यान अनेक पक्षाने यावर भाष्य केलंय. काश्मीरमध्ये वाढणाऱ्या हत्याकांढाविरोधात अनेक विरोधकांनी केंद्र सरकारला टार्गेट केलं आहे. केजरीवाल पुढे म्हणले, जेव्हा जेव्हा भाजप सरकार केंद्रामध्ये सत्तेत आली आहे तेव्हा तेव्हा कश्मीर जळालं. भाजप फक्त चुकीच्या पद्धतीने राजकारण करतेय.यांना हिंदू लोकांशी काहीचं देण घेणं नाहीये.

- Advertisement -
पाकिस्तानला आव्हान

आम आदमी पक्षाचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पाकिस्तानला सुधरण्याचा सल्ला दिलाय. काश्मीर हा भारतातचं आहे यापूर्वीही होता आणि कायम राहणार या मुद्यावर भाष्य करण्यासाठी मी लवकरच गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहे.


हे ही वाचा – वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी भाजपची नुपूर शर्मांवर कारवाई, पक्षातून केलं निलंबित

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -