घरदेश-विदेशआपची तुलना श्रीकृष्णाशी केल्याने अरविंद केजरीवाल भाजपाच्या निशाण्यावर

आपची तुलना श्रीकृष्णाशी केल्याने अरविंद केजरीवाल भाजपाच्या निशाण्यावर

Subscribe

राजकीय पक्षांनी "संविधान स्वातंत्र्याचा अपमान" करण्याची कोणतीही कसर सोडली नाही, तेव्हा देवाला हस्तक्षेप करावा लागला आणि संविधान वाचवण्यासाठी 26 नोव्हेंबर 2012 रोजी 'आम आदमी पक्षाची' स्थापना करण्यात आली.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल रविवारी म्हणाले की, आम आदमी पक्ष (आप) 2012 मध्ये देवाच्या हस्तक्षेपामुळे अस्तित्वात आला आणि भगवान श्री कृष्णाप्रमाणेच आप हा पक्षसुद्धा भ्रष्टाचार, महागाई आणि बेरोजगारीसारख्या मोठ्या राक्षसांनाही मारत आहे. इंदिरा गांधी स्टेडियमवर झालेल्या त्यांच्या पक्षाच्या पहिल्या राष्ट्रीय अधिवेशनात केजरीवाल म्हणाले, “आप ची स्थापना 26 नोव्हेंबर 2012 रोजी झाली, 63 वर्षांनी संविधान सभेने 1949 मध्ये भारतीय राज्यघटना स्वीकारल्यानंतर, अनेक महिन्यांच्या विचारविनिमयानंतर केले गेले तो कोणताही योगायोग नव्हता.

हे ही वाचा – Arvind Kejriwal on Kashmiri Pandit : 90 च्या दशकात काश्मिरी पंडितांसोबत जे घडलं तेच आजही घडतंय; अरविंद केजरीवालांचा दावा’ 

- Advertisement -

अरविंद केजरीवाल पुढे म्हणाले की जेव्हा राजकीय पक्षांनी “संविधान स्वातंत्र्याचा अपमान” करण्याची कोणतीही कसर सोडली नाही, तेव्हा देवाला हस्तक्षेप करावा लागला आणि संविधान वाचवण्यासाठी 26 नोव्हेंबर 2012 रोजी ‘आम आदमी पक्षाची’ स्थापना करण्यात आली. केजरीवाल म्हणाले की, ‘आप’ च्या स्थापनेपासून केवळ 10 वर्षात ज्या वेगाने आपची वाढ झाली आहे, त्या वेगाने इतर कोणत्याही राजकीय पक्षाची वाढ झालेली नाही. दिल्ली आणि पंजाबमध्ये सरकार स्थापन करण्यात पक्ष यशस्वी झालाच आहे. तर २० राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पंचायत, शहर आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपचे एकूण १,४४६ प्रतिनिधी निवडून आले आहेत.

हे ही वाचा – सुरक्षेचे कारण देत गुजरात पोलिसांना मला सर्वसामान्यांमध्ये जाण्यापासून रोखायचे होते : केजरीवाल

- Advertisement -

या देशाच्या विकासासाठी प्रत्येक राज्यात ‘आप’ची बीजे देवाने पेरली आहेत, आपल्यावर मोठी जबाबदारी टाकली आहे, असे दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणाले. अरविंद केजरीवाल म्हणाले की, दिल्ली आणि पंजाबमध्ये पेरलेल्या बीजाचे आता वृक्षमध्ये रूपांतर झाले आहे आणि हा वृक्ष त्याच्या सुखदायक सावलीचा आणि फळांचा लाभ लोकांना देत आहेत. हे बीज आता गुजरातमध्येही वृक्षात रूपांतरित होणार आहे. असा विश्वास सुद्धा केजरीवाल यांनी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले की, ‘आप’चे प्रामाणिक राजकारण आणि दिल्लीतील सरकारने केलेल्या कामासाठी लोक ‘आप’कडे पाहत आहेत. त्याचबरोबर आप फक्त 10 वर्षांचा पक्ष आहे. एक बाळ आहे. ज्याप्रमाणे श्रीकृष्णानाने अनेक मोठमोठ्या राक्षसांना मारले होते, त्याचप्रमाणे आम आदमी पक्षही अनेक मोठया शक्तींशी लढत आहे. भ्रष्टाचार, बेरोजगारी, महागाई अशा अनेक मोठमोठ्या राक्षसांना हा पक्ष मारत आहे.

हे ही वाचा – महाराष्ट्रात तमाशा करण्याचं काम सुरू, प्रभादेवी प्रकरणावरुन नाना पटोलेंची शिंदे सरकारवर टीका

भाजपचा आपवर निशाणा 

या सगळ्या प्रकरणात भाजपने सुद्धा अरविंद केजरीवाल यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे. भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, अरविंद केजरीवाल एक “सत्ता हडपणारे” आणि ”नुसतीच घोषणाबाजी करणारे” आहेत जे त्यांच्या पक्षाने दोन राज्यांच्या निवडणुका जिंकल्यानंतर स्वतःला “देव” मानतात. दारूच्या परवान्यात कमिशन खाणारी व्यक्ती स्वतःची तुलना कान्हाशी करत आहे. आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी भाजपच्या प्रवक्त्यांना प्रत्युत्तर देत त्यांच्या बुद्धिमत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, ‘एवढ्या बुद्धिमत्तेच्या व्यक्तीबद्दल काय म्हणता येईल. केजरीवाल यांनी द्वेष आणि दहशत पसरवणाऱ्या भ्रष्ट जुलमींना संपवणाऱ्या भगवान कृष्णाची प्रशंसा केली. ते केवळ फक्त उदाहरण देत होते

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -