घरताज्या घडामोडीUP Election 2022: हा सायकल चालवणाऱ्यांचा अपमान,अखिलेश यादवांनंतर केजरीवालांचा भाजपवर निशाणा

UP Election 2022: हा सायकल चालवणाऱ्यांचा अपमान,अखिलेश यादवांनंतर केजरीवालांचा भाजपवर निशाणा

Subscribe

उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरूवात झाली असून भाजप, सपा आणि आप या पक्षांच्या नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. यावेळी आम आदमी पार्टीचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज(सोमवार) लखनऊमध्ये प्रचारदरम्यान तुफान बॅटींग केली आहे. हा सायकल चालवणाऱ्यांचा अपमान असं म्हणत भाजपवर निशाणा साधला आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद बॉम्बस्फोटचा उल्लेख करत अखिलेश यादव आणि समाजवादी पार्टीवरही हल्लाबोल केला होता. तसेच ज्या पक्षाचं चिन्ह सायकल आहे. त्यावर अहमदाबादमध्ये बॉम्ब ठेवण्यात आले होते. अशा प्रकारचं वक्तव्य नरेंद्र मोदींनी हरदोई येथील जनतेला संबोधित करताना केलं होतं. यावर अखिलेश यादवांनी मोदींनी पलटवार केल्यानंतर आता आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

- Advertisement -

मोदींनी पहिल्यांदा देशातील सर्व शेतकऱ्यांना दहशतवादी म्हटलं होतं. त्यानंतर आता गरीब सायकल चालवणाऱ्या लोकांना दहशतवादी म्हणत आहेत. माझी लोकांना एक विनंती आहे की, जेव्हा तुम्ही मतदान करण्यास केंद्रात जाल. तेव्हा भाजपला विचारा की तुम्ही दहशतवादी आहात की? गरीब आणि शेतकरी दहशतवादी आहे, असं वक्तव्य अरविंद केजरीवाल यांनी जनतेला संबोधित करताना केला आहे.

- Advertisement -

दहशतवादी दोन प्रकारचे असतात. एक जनतेला त्रास देणारा आणि दुसरा भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांना घाबरवणारा. केजरीवाल हा एक असा दहशतवादी आहे जो भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांना घाबरवतो, असं केजरीवाल म्हणाले.

शेत आणि शेतकऱ्यांना जोडून त्यांच्या समृद्धीचा पाया घातला. आमची सायकल ,सामाजिक बंधने तोडून मुलींना शाळेपर्यंत पोहोचवते. महागाईमुळे आमच्या सायकलचा त्यावर काहीही परिणाम होत नाही. ती वेगाने धावते आणि आमची सायकल हे सर्वाचं विमान आहे. सामान्य लोकांचा आणि ग्रामीण भारताचा अभिमान आहे. परंतु सायकलचा अपमान हा देशाचा अपमान आहे. असा पलटवार अखिलेश यादव यांनी ट्विटमधून केलाय.


हेही वाचा : UP Election 2022 : सायकलचा अपमान हा देशाचा अपमान, अखिलेश यादव मोदींवर कडाडले


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -