Maharashtra Assembly Election 2024
घरदेश-विदेशDelhi Assembly Election 2025 : 'आप'ची मदार महिला मतदारांवर; महाराष्ट्र पॅटर्न राबवणार

Delhi Assembly Election 2025 : ‘आप’ची मदार महिला मतदारांवर; महाराष्ट्र पॅटर्न राबवणार

Subscribe

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना आणि झारखंडमध्ये मुख्यमंत्री मैय्या सन्मान योजना गेमचेंजर ठरल्याचे पाहायला मिळाले. या दोन्ही राज्यांमध्ये महिलांसाठी योजना राबवणारे सरकार बहुमतासह सत्तेत आले आहे. याचपार्श्वभूमीवर आता आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत पुन्हा सत्तेत येण्यासाठी महिलांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

नवी दिल्ली : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना आणि झारखंडमध्ये मुख्यमंत्री मैय्या सन्मान योजना गेमचेंजर ठरल्याचे पाहायला मिळाले. या दोन्ही राज्यांमध्ये महिलांसाठी योजना राबवणारे सरकार बहुमतासह सत्तेत आले आहे. याचपार्श्वभूमीवर आता आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत पुन्हा सत्तेत येण्यासाठी महिलांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.(Arvind Kejriwal will give money through the Chief Minister Mahila Samman Yojana)

महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीनंतर आता पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात दिल्लीत निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीसाठी आतापासून राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. आम आदमी पक्षाने या निवडणूक प्रचारामध्ये आघाडी घेतली आहे. राजधानी दिल्लीमध्ये ठिकठिकाणी अरविंद केजरीवाल यांचे बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरवर आप पक्षाने महिलांना स्थान दिले आहे. त्यामुळे आगामी निवडणूक जिंकण्यासाठी आप पक्षाची मदार महिला मतदारांवर असल्याचे अधोरेखित होत आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये हीट झालेल्या लाकडी बहीण आणि मैय्या सन्मान योजनेच्या पार्श्वभूमीवर ‘आप’ने देखील याच मार्गाचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Ajit Pawar : महाराष्ट्रातील विजयानंतर आता अजित दादांचे राष्ट्रीय राजकारणाचे संकेत; दिले हे उत्तर…

सध्या दिल्लीत आप पक्षाचे सरकार आहे. 2024 च्या अर्थसंकल्पात दिल्ली सरकारने मुख्यमंत्री महिला सन्मान योजना जाहीर केली होती, ज्यांतर्गत 18 ते 60 वयोगटातील कर न भरणाऱ्या महिलांच्या खात्यात दरमहा 1000 रुपये जमा करण्याचे आश्वासन देण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले होते. सध्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकार लाभार्थी महिलांच्या खात्यांमध्ये पहिला हप्ता लवकरात लवकर जमा करेल, असे राजकीय जाणकारांच्या मत आहे. कारण अरविंद केजरीवाल यांनी 22 नोव्हेंबर रोजी “सातवी रेवडी लवकरच येत आहे” असे भाष्य केले होते.

- Advertisement -

भाजपाने नेहमीच आप पक्षाच्या मोफत योजनांना “रेवडी संस्कृती” म्हणून हिणवले आहे. याचपार्श्वभूमीवर केजरीवाल यांनी ‘रेवडी पे चर्चा’ अशी मोहिम सुरू केली असून ते दिल्लीतील रहिवाशांशी थेट संवाद साधत आहेत. तसेच भाजपा सत्तेत आल्यास दिल्ली सरकारच्या सर्व योजना थांबवल्या जातील, असा इशारा देखील देत आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनीही एका मुलाखतीत बोलताना वक्तव्य केले होते की, आम्हाला अभिमान आहे की आम्ही रेवडी देतो आणि पुढेही देऊ. कारण गरजू लोकांना लाभ मिळेल अशी आमच्या धोरणांची रचना करण्यात आली आहे.

हेही वाचा – Bangladesh ISKCON : बांगलादेशात इस्कॉनवर बंदी घालण्यास उच्च न्यायालयाचा नकार; सरकारला फटकारले


Edited By Rohit Patil 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -