घरदेश-विदेशतरुणीने मोडलं फडणवीसांचं रेकॉर्ड; बनली देशातील सर्वात तरुण महापौर

तरुणीने मोडलं फडणवीसांचं रेकॉर्ड; बनली देशातील सर्वात तरुण महापौर

Subscribe

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा सर्वात कमी वयात महापौर बनण्याचा विक्रम मोडला आहे. केरळच्या आर्या राजेंद्रन हिने फडणवीस यांचा विक्रम मोडला आहे. तिरुवनंतपुरम शहराच्या महापालिकेच्या महापौर म्हणून आर्या राजेंद्रन यांची निवड झाली आहे. वयाच्या २१ व्या वर्षी आर्या राजेंद्रन महापौर बनली. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे काही वर्षांपूर्वीपर्यंत देशातला सर्वांत तरुण महापौर म्हणून विक्रम होता.

केरळची राजधानी तिरुवनंतपुरम शहराच्या महापौर म्हणून आर्या राजेंद्रन यांची निवड झाली आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सदस्य असलेल्या आर्या राजेंद्रन देशातल्या आतापर्यंतच्या सर्वात तरुण महापौर ठरल्या आहेत. आर्या राजेंद्रन यांचे तिरुवनंतपुरमच्या LBS कॉलेजमध्ये शिक्षण सुरू असून त्या तिथून इंजिनीअरिंगच्या पदवीसाठी अभ्यास करत आहेत. पण इंजिनीअर व्हायच्या आधीच त्या शहराच्या महापौरपदी विराजमान झाल्या आहेत.

- Advertisement -

स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया या विद्यार्थी संघटनेत आर्या कार्यरत होत्या. SFI च्या पदाधिकाऱ्यांमध्ये त्यांचा समावेश आहे. आर्या यांनी महापालिकेची निवडणूक पहिल्यांदाच लढवली. CPIM च्या जिल्हा सचिवालयानेच त्यांच्या उमेदवारीची शिफारस केली होती. थिरुवनंतपुरमच्या मुदवनमुगल वॉर्डातून त्या निवडून आल्या.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -