लडाख : काँग्रेस नेते राहुल गांधी हे मागील काही दिवसांपासून लेह-लडाखच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी त्यांचा लडाख दौरा 25 ऑगस्टपर्यंत वाढविला आहे. दरम्यान त्यांनी आज सोमवारी पॅंगॉन्ग त्सो लेकवरून बाईक चालवत 264 किलो मीटर दूर असलेल्या खार्दुंग ला येथे पोहोचले. येथील स्थानिक लोकांना भेटले आणि त्यांच्यासोबत फोटोही काढले.(As many as 264 Km Bike Ride by Rahul Gandhi Reached Khardung from Pangong Tso Lake)
राहुल गांधी 17 ते 18 ऑगस्ट दरम्यान लडाख दौऱ्यावर गेले होते, परंतु 18 ऑगस्ट रोजी त्यांचा दौरा 25 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आला होता. शनिवारी 19 ऑगस्ट राहुलने लडाख ते पँगॉन्ग त्सो लेकपर्यंत बाईक चालवली. त्याच वेळी, कॉंग्रेस नेत्याने रविवारी 20 ऑगस्ट रोजी पँगॉन्ग त्सो तलावाच्या काठावर त्यांचे वडील माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना श्रद्धांजली वाहिली.
बैठकीला राहणार उपस्थित
25 ऑगस्ट रोजी होणाऱ्या 30 सदस्यीय लडाख स्वायत्त हिल डेव्हलपमेंट कौन्सिल-कारगिल निवडणुकीच्या बैठकीलाही राहुल गांधी उपस्थित राहणार आहेत.
चीन घुसखोरी करत असल्याचे केले होते वक्तव्य
कॉंग्रेस नेते खासदार राहुल गांधी लेह लडाखच्या दौऱ्यावर असताना त्यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त लडाखमधील पॅंगॉन्ग तलावाच्या काठावर श्रद्धांजली वाहिली होती. यावेळी राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर चीनने लडाखमध्ये केलेल्या घुसखोरीवरून निशाणा साधला होता. चीनने केलेल्या घुसखोरीच्या वक्तव्यावरुन देशात सध्या चांगलेच राजकीय वातावरण तापले होते.
हेही वाचा : मतदारांना पुन्हा हवे आहेत पंतप्रधान म्हणून मोदीच; वाचा- कोणत्या सर्व्हेतून आली माहिती समोर
बाईक रायडींगचा व्हिडीओ होतोय व्हायरल
काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या लडाखच्या दौऱ्यावर आहेत. येथे ते सुंदर दऱ्याखोऱ्यांमध्ये आनंद लुटत आहेत. त्याने पूर्व लडाखमधून पँगॉन्ग लेकच्या मार्गावर बाइक चालवली, ज्याचे फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाले.