घरदेश-विदेशभारत जोडो यात्रेचे सीमोल्लंघन होताच, काँग्रेसकडून सावरकर वादाला पूर्णविराम

भारत जोडो यात्रेचे सीमोल्लंघन होताच, काँग्रेसकडून सावरकर वादाला पूर्णविराम

Subscribe

नवी दिल्ली : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेला महाराष्ट्रात भरघोस प्रतिसाद मिळला. या यात्रेच्या शेवटच्या टप्प्यात राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून राज्यात वादळ उठले होते. पण आता या यात्रेने सीमोल्लंघन करून मध्य प्रदेशात प्रवेश केला आहे. त्याबरोबर काँग्रेसने या वादालाही पूर्णविराम दिला आहे.

वाशिम येथे काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर आणि स्वातंत्र्य सेनानी बिरसा मुंडा यांच्यात तुलना करून नव्या वादाला तोंड फोडले होते. आदिवासी समाजाच्या न्याय हक्कासाठी भगवान बिरसा मुंडा ब्रिटिश सरकारच्या विरोधात लढले व वयाच्या 24व्या वर्षी शहिद झाले. ब्रिटिशांच्या बलाढ्य सत्तेसमोर ते झुकले नाहीत. पण भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आदर्श स्वातंत्र्यवीर सावकर आहेत. ते दोन-तीन वर्ष अंदमानच्या कारागृहात होते. तिथे त्यांनी दयाअर्ज लिहिण्यास सुरुवात केली. त्यांनी ब्रिटिशांकडून पेन्शन घेतली. त्यांनी ब्रिटिशांसाठी आणि काँग्रेसच्या विरोधात काम केले, असे ते म्हणाले होते.

- Advertisement -

नंतर पुन्हा अकोल्याला राहुल गांधी यांनी याचा पुरावा म्हणून पत्रकार परिषदेत कागदपत्रे दाखविली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना हे पत्र पाहायचे असेल तर त्यांनीही ते पाहावे. सावरकरांनी इंग्रजांची मदत केली होती, असे राहुल गांधी म्हणाले होते. यावरून राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. भाजपाने राहुल गांधी यांच्यासह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.

खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील ‘भारत जोडो’ यात्रेने महाराष्ट्राची सीमा ओलांडून मध्य प्रदेशात प्रवेश केला आहे. त्याचबरोबर सावरकर यांच्या वादापासून अंग झटकण्यास काँग्रेसने सुरुवात केली आहे. सावरकरांचा मुद्दा संपला असून राहुल आता फक्त भारत जोडो यात्रेवर लक्ष केंद्रित करत आहेत, असे पक्षाचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी बुधवारी स्पष्ट केले.

- Advertisement -

स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत काँग्रेसचे बहुतांश नेते नेहमीच भाजपावर टीका करतात. आज प्रभारी संपर्क सरचिटणीस जयराम रमेश यांनी हा मुद्दा टाळत सावरकरांचा अध्याय आता बंद झाल्याचे सांगितले. मध्य प्रदेशातील बुरहानपूर जिल्ह्यात सुरू असलेल्या भारत जोडो यात्रेदरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत जयराम रमेश बोलत होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -