घरCORONA UPDATEकोरोनामुळे मृत्यूमुखी पडणारे शहीद- औवेसी

कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणारे शहीद- औवेसी

Subscribe

दिल्लीतील निजामुद्दीम येथे तबलीगी जमातीच्या मरकज मध्ये हजारोच्या संख्येने सहभागी झालेल्यांपैकी अनेकजणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तसेच यापैकी अनेकजण विविध राज्यात परतले असून तेथेही समुह संसर्ग वाढल्याचे धक्कादायक चित्र बघावयास मिळत आहे. यामुळे देशभरात या मरकजमध्ये सहभागी झालेल्यांचा शोध सुरू आहे. याचदरम्यान ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद-उल मुस्लिमीनचे (All India Majlis-e-Ittehadul Muslimeen) अध्यक्ष असाउद्दीन औवेसी यांनी कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्ती शहीद असून त्यांना कफनाचीही गरज नसल्याचे वादग्रस्त टि्वट केले आहे.

औवेसींच्या या टि्वटवर भाजपने आक्षेप घेतला असून असे विधान करून औवेसी जमातियांना संसर्ग वाढवण्यास चिथावणी देत असल्याचा आरोप भाजप नेते संबित पात्रा यांनी केला आहे. औवेसी यांनी एका वृत्तवाहीनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की ज्या व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे त्यांना शहीदांचा दर्जा दयायला हवा. त्यांना अंत्यसंस्काराआधी कफनही घालण्याची गरज नाही. पण मृत्यू झाल्यानंतर त्यांना तात्काळ दफन करायला हवे. औवेसींच्या या विधानावरून भाजप नेते आक्रमक झाले आहेत.

- Advertisement -

औवेसींचे हे विधान शहीदत्वाची नवीन परिभाषा आहे का असा सवाल संबित पात्रा यांनी केला आहे. तसेच असे विधान करून तुम्ही तबलीगी जमातमध्ये सहभागी झालेल्या लोकांना चिथावणी देत आहात असा आरोपही पात्रा यांनी केला आहे. यामुळे हा वाद अधिक चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -