Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी Asaduddin Owaisi: हिंमत असेल तर चीनवर सर्जिकल स्ट्राइक करून दाखवा, ओवैसींचं खुलं आव्हान

Asaduddin Owaisi: हिंमत असेल तर चीनवर सर्जिकल स्ट्राइक करून दाखवा, ओवैसींचं खुलं आव्हान

Subscribe

एआयएमआयएम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी हे काल (मंगळवार) तेलंगणातील संगारेड्डी भागाच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर जोरदार टीका केली. भाजप नेतृत्वाखालील केंद्र सरकारमध्ये जर हिंमत असेल तर त्यांनी चीनमध्ये थेट सर्जिकल स्ट्राईक करून दाखवावे, असं खुलं आव्हान असदुद्दीन ओवैसी यांनी केंद्र सरकारला दिलं आहे.

सर्जिकल स्ट्राइक करणार म्हणे, बापाची जहागीर आहे का?

भाजपचे राज्य प्रमुख संजय बांदी यांनी तेलंगणाच्या जुन्या शहरावर सर्जिकल स्ट्राईक करण्याबाबत वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा ओवैसींनी चांगलाच समाचार घेतला. हे वाट्टेल ते बोलत चाललेत. जुन्या शहरात सर्जिकल स्ट्राइक करणार म्हणे. बापाची जहागीर आहे का? हिंमत असेल तर करून दाखवा, आम्ही काय बांगड्या भरून बसलोय का?, असं प्रत्युत्तर ओवैसी यांनी संजय बांदी यांना दिलं आहे.

सर्जिकल स्ट्राइक करून दाखवा

- Advertisement -

तुमच्यात हिंमत असेल तर चीनवर सर्जिकल स्ट्राइक करून दाखवा. मोदींना सांगा की चीनला डेबसांग आणि डेमचांगवरून हाकलून लावा. २ हजार किलोमीटरचा भाग चीननं बळकावलाय. पण तिथे काही करत नाही, असंही ओवैसी म्हणाले.

स्टेअरिंग माझ्या हातात असेल तर…

केसीआर आणि औवेसी यांच्यात गुप्त करार झाल्याच्या दाव्यावरून ओवैसी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही जोरदार निशाणा साधला. जर स्टेअरिंग माझ्या हातात असेल तर तुम्हाला वेदना का होतात? भाजपने मंदिरांसाठी कोट्यवधी रुपये मंजूर केले आणि त्यानंतरही ते माझ्यावर आरोप करतात की, स्टेअरिंग माझ्या हातात आहे, असं म्हणत ओवैसी यांनी शाह यांच्यावर टीका केली.


- Advertisement -

हेही वाचा : …तर न्यायालये बंद करा, असदच्या एन्काऊंटरवरून ओवैसीची


 

- Advertisment -